गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.
गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.
।।।। बॅच 1995/96।।।।
शा ळा या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण विश्व सामावले आहे याची जाणीव आपल्याला शाळा सोडून काही वर्षे झाल्यानंतर समजले. तसे बऱ्यापैकी 25 वर्षाचा मोठा कालावधी लोटून गेला......असो
आपली शाळा स्व: दादासाहेब उंडाळकर माध्यमिक, उच्चमाध्यामिक विद्यालय उंडाळे सांगायचे तात्पर्य म्हणजे 10वीच्या व्हाट्सउप ग्रुपवर गेट- टू गेदरची पोस्ट पाहिली आणि मन भारावून गेले या निमित्ताने आठवणींच्या शाळेत जाण्याचे ठरवले व मन अगदी जुन्या आठवणीत रमून गेले. मनात अनेक जुन्या आठवणींची गर्दी झाली. ती अशी की शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांची होते अगदी तसे।
क्लास सुरू असताना एकमेकाकडे चोरून पाहणे,कागद, खडू फेकून मारणे, दुपारची बेल झाली की मधल्या सुट्टीतील एकत्रीत बसून मित्र मैत्रिणींचा वाटून खाल्लेला डबा, आजच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला त्याची चव येऊ शकत नाही.चॉकलेट साठी झालेले रुसवे,फुगवे, काय ती आपुलकी होती. त्यात एक प्रकारचा आपलेपणा होता.क्लास चालू असताना केलेल्या खोड्या व सरांचा डस्टरने खाल्लेला मार,नंतर सगळेच बसणार गपगार, सर गेल्यानंतर होणारी वादावादी, परंतु त्यात एकप्रकारचे प्रेम होते. तसेच पी.टी. च्या तासाला क्रिकेट खेळणे,पटांगणावरील आर.एस.पी.चा क्लास,ध्वजारोहण सोहळा,या सर्व क्षणानी आम्हाला समृद्ध केलं.ते आजही आमच्या मनात कायम कोरले गेले आहेत.
माझी शाळा घरापासून दिड कि. मी. अंतरावर आहे व मित्र मंडळी साधारण 4 कि. मी.अंतरावर त्यामुळे पायीच प्रवास करावा लागत होता. रस्त्याने जात असताना कुठे आंबा,चोर पेरू,चोर ऊस चोर, चिंचा चोर चिंचेचं नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटते. ह्यासाठी जीवाचे रान करायचो व खाकी चड्डीच्या दोन्ही खिशात सापडलेला माल दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुट्टीत मित्रा बरोबर खायचो त्यावेळेस वेगळीच मज्जा येत होती. शाळा सुटल्यानंतर सर्वात पुढे जाऊन त्या अबाल वयात केलेली चोरी,ह्यांच्या तक्रारी घरी व शाळेत देखील येत होत्या.मग काय, मालकाचे ऊस, आंबा,पेरू,व चिंचा याच्या बरोबर खाल्लेले बोल, व शिक्षकांचा खाल्लेला मार ,अजून जसेच्या तसे आठवते.
त्यातच एक प्रकारचा आनंद बहरलेला असायचा, 12 वी पर्यंत शिक्षण उंडाळे येथेच झाले. कालांतराने सायन्स, कॉमर्स, आर्ट तुकडीमध्ये आम्ही विभागलो गेलो.परंतु 8वी ते 10 वी च्या आठवणी आजही ताज्या आहेत.त्यामुळे शाळेशी *इमोशनल बँन्डिग* खूप मजबूत आहे.
किंबहुना कुठे येता-जाता शाळेला बाहेरून जरी
पाहिले तरी खूप समाधान वाटते.आणि जुन्या आठवणित मन रमून जाते.
।। नाराज तो हम खुद से है।।
।। आपसे तो आज भी ईष्क है।।
वर्गा प्रमाणे इथेही आम्ही अनेक अविस्मरणीय क्षण व्यथीत केले आहेत. मैदानी खेळ, तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी गायन, वक्तृत्व, मराठी भाषांतर, क्रिकेट, कब्बडी, खो-खो आदी स्पर्धेत हिरीरीने भाग घ्यायचो.
याप्रमाणे शाळेचा आणखी एक दिवस महत्वाचा असायचा तो म्हणजे मकर संक्रात शाळेला सुट्टी असायची पण दुसऱ्या दिवशी माझ्यासारखी उनाड मूल न विसरता शाळेत हजर असायची तिळ गुळ घ्या गोड बोला एवढे बोलले तरी मन लाजेने चुर व्हायचे, पण त्यात एक प्रकारचा आनंद लपलेला असायचा आजही *तिळ गूळ* पाहिले की त्या हाताने दिलेल्या *तिळ गुळाची* चव इतक्या वर्षांनी देखील जिभेवर रेंगाळतेय, कॅलेंडरची पाने बदललित आठवण अजून तशीच आहे.
25 वर्षांनी एकत्र आलेल्या गुरू-शिष्यांनी मुलामधून अमर पाटील,श्रीकृष्ण गायकवाड,दशरथ पाटील, निवास सपकाळ, तसेच मुलीमधून मनीषा गायकवाड, निर्मळा पाटील, यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नात्यातला स्नेह जागविला
कुंभारासारखा गुरू नाही रे जगात"वर घालतो धपाटा आत मायेचा हात*
वरील उक्तीला प्रेरित होऊन गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देणाऱ्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यास वंदनीय सध्या निवृत्तीचे जीवनाचा सुखकर प्रवास करणारे एस.पी.पाटील, एच.बी.थोरात,ए. बी. पाटील,ढवळे सर, कुसुरकर सर, मिरजकर सर, वीर सर, डी. बी. पाटील शिंदे सर, एन.टी. मोरे, ए.आर.पाटील.,सी.बी. जाधव डी. जी.शेवाळे
गायकवाड सर,आदी शिक्षकांना शाल श्रीफळ,आंबा रोपटे देऊन यांचा सन्मान करण्यात आला.
काही नावे अनावधानाने राहिली असतील माफी असावी ही सर्व मंडळी म्हणजे आमचा मातीचा गोळा त्यांच्या हातात आला व त्यांनी त्यास आकार दिला.त्यामुळे आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या पक्षा प्रमाणे संचार करत आहोत. हे सर्व श्रेय वडीलधाऱ्या मंडळींचे आहे.त्यांनीच आमचे कान उपटले व दुसऱ्या बाजूने पोटच्या मुलासारखी माया लावली. ते काही दिखाव्यासाठी नव्हते.आमच्या आई-वडिलांसारखी मंडळी *आम्हाला बाहेरच्या(व्यवहाराच्या) दुनियेत भक्कम उभे करणारे खांब आहेत.* एकूणच आमच्या आनंदी व सुखकर चाललेल्या वाटचालीत शिक्षक लोकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणारे आमचे मित्र- मैत्रिणी (कोणाचेही नाव घेत नही) यांची आठवण अस्वस्थ करेल या कार्यक्रमास सुमारे .....माझी विद्यार्थी व......शिक्षक उपस्थित होते.अतिशय अविस्मरणीय सोहळा पार पडला. *गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी* दिवस कसा गेला तेच समजले नाही. म्हणून तर म्हणलं मी *गेट-टू गेदर* हा *दिलासा* *विसावा* की *हुरहूर*.
*असाच राहशीलना आमच्यासाठी असून नसल्यासारखा आणि नसून असल्यासारखा !
26 डिसेंबरची पहाट जणू आमच्यासाठी वेगळाच आनंद व नवी हुरहूर घेऊन उजाडली गेली कारण या दिवशी आम्ही मित्र- मैत्रिणी तब्बल 25 वर्षांनी भेटलो, तीन वर्षे पांढरा शर्ट व खाकी चड्डी घालणारा आज अचानक सूट बुटात पाहून क्षणभर विचारात पडलो व एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत तो/तीच आहे का? असे प्रश्न डोक्यात गोंधळ करीत होते.तेवढ्या कालावधीत चेहऱ्यावरील स्मित हास्याने आमची ओळख करून दिली.आणी जुन्या आठवणीचा जणू फडच रंगला आता आमच्यापैकी कोण,डॉक्टर, इंजनिअर,शिक्षक,कोण छोट्या-मोठ्या कंपनीत, कारखानदारीत,कोण स्वतःचा व्यवसाय तर काही उत्तम शेती करत आहेत.ऐकून खूप समाधान झाले. अनेकांना मूल झाली असली तरी आम्ही या कार्यक्रमास फक्त शाळेतील पाठीमागच्या बाकावर बसणारी *उनाड* मुलंच होतो.माझ्यासह अनेक मित्रांची वयानुसार वाढलेल पोट व पांढरे केस कलप करून आहे तरी ते निदर्शनास येत होते.त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला होता.
।।।।। माजी विद्यार्थी ।।।।।।
शकुर मुल्ला.
Comments
Post a Comment