उंडाळेत वडाप वाहतुकदारांची मनमानी.

 उंडाळेत वडाप वाहतुकदारांची मनमानी.

अँपे रिक्षा रस्तावर पार्किंग..
पोलीस प्रशासनाची चुप्पी, कारवाईची नितांत गरज.

उंडाळे - गोंडवाना न्युज

  उंडाळे ता.कराड येथील कराड-चांदोली मार्गावर सध्या अँपे रिक्षा वाहतुकदाराची मनमानी कारभार सुरु असुन वाहतुक नियमांना तिलांजली दिली जात आहे. गत दोन वर्षापुर्वी लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातुन पाचवड फाटा-चांदोली मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले असुन मुंबई-पुण्यातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी खुशकीचा मार्ग असल्याने सर्रास प्रवाशांनसह, अवजड वाहतुकही सध्या याचं मार्गावरुन केली जात आहे. या मार्गावर आसपासच्या परिसरातील वाडी-वस्त्यासाठी दळणवळण, शैक्षणिक व व्यापारासाठी महत्वपुर्ण बाजारपेठ म्हणुन उंडाळे कडे पाहण्यात येते, मात्र सध्या उंडाळे बसस्थानकावर खाजगी वाहतुकदाराची मनमानी कारभार चालला असुन,रस्त्यामध्ये कुठेही, कसेही वाहनाचे पार्किंग केले जात आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुस रस्ते प्राधिकरणाने फुटपाथ वजा नाल्याचे बांधकाम केले असुन सदरिल फुटपाथवर उंडाळे बस स्थानकावरील अँपेरिक्षा वाहतुकदाराचा "रिक्षा युनियनचा" बोर्ड लावण्यात आला आहे, मात्र या युनियन मार्फत स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासनाची कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे दिसुन येते. 

  उंडाळे बसस्थानकावर परिसरात शाळा, काँलेज व महाविद्यायल असुन शाळा, काँलेज सुटण्यावेळेस विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी होत असुन संबधित अँपे रिक्षा व वडाप वाहतुकदार रस्त्यावरती अस्थावस्थ पार्किग करत असुन महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करत असुन बसस्थानकच्या दोन्ही बाजुस असण्या-या व्यापारी वर्गावर अरेरावी, प्रसंगी मारहाणीचे प्रसंग घडत ,असल्यासह  रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरत असुनही स्थानिक पोलीस प्रशासन या बाबत का? दुर्लक्ष करत आहे.असा प्रश्न व्यापारासह स्थानिकामधुन होत आहे.

  उंडाळे बसस्थानक परिसरात संबंधित वडाप वाहतुकदाराकडुन "वडाप युनियन" कडुन लावण्यात आलेल्या बोर्डाची पोलिस प्रशासनाकडुन शहनिशा करुन संबधित युनियन खरोखरच रजिस्टर आहे का? असली तर त्यामध्ये किती रिक्षाची नोंदणी आहे, त्याच बरोबर नोंदणीकृत रिक्षाची कागदपत्रे, लायसेन्स, व वाहतुक परवाने व्यवस्थित आहेत का? याची पडताळणी करुन विना परवाना वाहनावर कडक कारवाई करुन वाहतुकीस अडसर करण्या-या वाहनधारकाचे वरिष्ठ पातळीवरुन योग्य तो बंदोबस्त करावा अशी उंडाळे बसस्थानक परिसरातील व्यापारी व नागरिकामधुन होत आहे.


अपघातास कारणीभूत  ठरताहेत  बेफिकिर वडाप वाहतुदार..

उंडाळे बसस्थानक परिसरात शाळा,काँलेज व महाविद्याल रस्त्याच्या दोन्ही बाजुस असुन अस्थावस्थ पार्किंग व बेजबाबदारपणे वाहन चालवण्यामुळे विद्यार्थी व पादचारी चे अपघात झाले असुन अनेक जण कायस्वरुपी जायबंदी होण्याबरोबर कायमचे अपगंत्व आले आहे.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .