रिळे (ता. शिराळा ) येथे महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या 2515निधीतून बांधण्यात येणाऱ्या महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
रिळे (ता. शिराळा ) : येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या 2515 योजनेतून 8.47 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन युवक राष्ट्रवादी काँग्रेसे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच आशाताई आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ, माजी सरपंच एम. एस. पाटील, पोलिस पाटील सुधीर पवार, भैरवनाथ पाणीपुरवठा माजी अध्यक्ष भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोविंद पाटील, दिपक दोडके, सुवर्णा पाटील, श्रीकांत पाटील, रघुनाथ बंडगर तसेच बाळकृष्ण खामकर, रघुनाथ सुतार, सुभाष सुतार, वैशाली देशमुख, दिनकर पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment