GONDWANA BREAKING NEWS.

                


                  ब्यूरो  रीपोर्ट - शकूर मुल्ला.

                  दिनांक ३१ डिसेंबर, २०२१, शुक्रवार.


● कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत


●  नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ ४५ किलोमीटरचे काम बाकी राहिले आहे


● राज्यात एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण १० हजार ७६४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, ७१९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे


● सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कोकण किनारे गजबजले, ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी


● पुण्यातील येरवडा परिसरात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला; दोन पोलीस जखमी


● वैद्यकीय अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांच्या नव्या महाविद्यालयांच्या मूळ शुल्कात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत साधारण दहा ते पंधरा टक्क्यांची घट करण्यात आली आहे


● भारतात वर्षभरात १२७ वाघांचा मृत्यू ; सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; व्याघ्र संरक्षणाचे मोठे आव्हान


● मुख्यमंत्री पदासाठी सिद्धूंचे नाव जाहीर करण्यास नकार, सोनिया गांधी यांनी फेटाळली मागणी


● काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानक परदेशी रवाना झाल्याने काँग्रेसचे पंजाबमधील नेते अस्वस्थ झाले ; पुढील आठवड्यात परत येणार


● वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराजाची रात्र तुरुंगातच, कोर्टाने सुनावली २ दिवसांची पोलीस कोठडी 

 

▪️ मंत्रालयातही ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन पोलीस आणि एक कर्मचारी बाधित, आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांची माहिती 


▪️ राज्यात निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 


▪️ राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय! आज नव्या ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर मृत्यूदर २.११ टक्क्यांवर 


▪️ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मोढा फाट्यावर भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळल्याने वऱ्हाडावर काळाचा घाला; ६ वऱ्हाडी जागीच ठार, १४ जखमी


▪️ नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा व्हेरियंटचा पहिला रूग्ण आढळला; कोरोना नियमांचं पालन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन 


▪️ शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना झटका! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला


▪️ कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह आठ राज्यांना केंद्राकडून विशेष निर्देश; केंद्र म्हणाले- मृत्यू रोखण्यासाठी आतापासूनच आवश्यक पावले उचला


▪️ राज्यातील निवासी डॉक्टर आज संपावर; राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत, निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेला मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता 


▪️ नेत्यांची चिंता वाढली! आ. शिवाजीराव कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि दोन दिवसांपूर्वीच ज्यांच्या मुलीचा लग्न सोहळा पडला त्या हर्षवर्धन पाटलांनाही कोरोनाची लागण  


▪️ एमपीएससी विरु्द्ध सोशल मीडियावर लिहाल तर परीक्षेला बसू देणार नाही, आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप; आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसण्यास मज्जाव करणार 


• सेंच्युरियन मैदानावर भारताचा ऐतिहासिक विजय, द.आफ्रिका विरुद्ध १-० ने आघाडी, के एल राहुल ठरला विजयाचा शिल्पकार.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .