कापरी (ता. शिराळा) येथे शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला.
कापरी (ता. शिराळा) येथे शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला.
शिराळा - नानासाहेब कांबळे.
कापरी (ता. शिराळा) येथे सिध्देश्वर मंदिर परिसरातील पाझर तलाव जवळील श्रीकांत जयसिंगराव पाटील यांचे शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 20 मेंढ्या मृत झाल्या, 4 पिल्ले बिबट्याने पळवुन नेली तर, 7 पिल्ले जखमी झाली आहेत. या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी भेट देवून वस्तूस्थितीची पाहणी केली. मेंढ्यांचे मालक श्री. सुभाष तुकाराम तांदळे (रेड, ता. शिराळा) यांना दिलासा दिला. निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव व बाबा गायकवाड यांनी पंचनामे केले. यावेळी सरपंच मोहन पाटील, उपसरपंच संदीप पाटील, माजी सरपंच बाजीराव पाटील, प्रशांत, सुशांत, संतोष, अमर, अक्षय पाटील, पोलिस पाटील बजरंग कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment