GONDWANA NEWS BREAKING..

 


                       ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.

             दिनांक १५ डिसेंबर, २०२१, बुधवार.




मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले, तर कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त


● पोलिसांच्या पदोन्नतीची रखडपट्टी; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे ४५ हजार अंमलदारांचे स्वप्न लाल फितीत


● बोगस डिग्रीप्रकरणी वसई-विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या; सुनील वाडकर असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे.


● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही; चांदीवाल आयोगासमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे स्पष्टीकरण


● मंत्रालयात विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना २०० रुपयांचा दंड; मंत्रालय पोलिसांची कारवाई 


● सोलापूरमध्ये बोगस कंपनीच्या आधारे जप्त साखर कारखान्याची कोट्यावधींची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; लातूरच्या दोघांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल


● राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी बोगद्यात केवळ दहा टक्के दिवे सुरू असल्याने बोगद्यात अंधार पसरल्याने अपघात होण्याचा धोका वाढला


● नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींपैकी दोन महिला आरोपी डॉक्टरांना सशर्त स्वगृही परतण्यास हायकोर्टाची परवानगी


● 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल-२०२२' चे १४ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजन; कला संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने विविध सामाजिक संकल्पनांवर आधारित 'कलाशिल्प सादरीकरण' केले जाणार 


● लखीमपूर हिंसाचार पूर्वनियोजित; विशेष तपास पथकाचा न्यायालयात निर्वाळा; आरोपांत वाढ करण्याची मागणी


● त्रुटी असल्याने जातनिहाय जनगणनेचा अहवाल सार्वजनिक नाही; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण 


● १०० कोटी खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत केली वाढ 


● पुण्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा १६ डिसेंबरपासून सुरू होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती


● राज्यात दिवसभरात ८ जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला, ८ रुग्णांपैकी ७ जण मुंबईतील तर एक रुग्ण वसई-विरारमधील असल्याची माहिती 


● स्वाधार शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता ऑनलाईन होणार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा 


● सहा महिन्यात येणार तीन वर्षांच्या पुढील मुलांसाठी कोरोनावरील लस, 'सीरम'चे सीईओ अदर पूनावाला यांची माहिती  


● संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून बडतर्फीचं हत्यार, कारणे दाखवा नोटीस पाठवणार 


गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, १८ डिसेंबरला अमित शाह अहमदनगरला सहकार परिषदेसाठी उपस्थित राहणार  


● महाराष्ट्रातील बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार; पुढची सुनावणी ११ जानेवारीला होणार


● शिंगणापूर घाटात कार ४०० फूट खोल दरीत कोसळली, या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू, या अपघाताची नातेपुते पोलीस ठाण्यात नोंद  


● थंडीची चाहुल लागल्यानं भिगवणच्या उजनी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांचं आगमन, परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .