पाडळीवाडी(ता.शिराळा) येथे विविध विकास कामाचा शुभारंभ.

      पाडळीवाडी(ता.शिराळा) येथे  विविध  विकास  कामाचा शुभारंभ.

'आपला बझारच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक, शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा  साधना पाटील यांच्या हस्ते संपन्न'.


शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.

पाडळीवाडी (ता. शिराळा) येथे 15 वा वित्त आयोग निधीतून बचत गटासाठी ग्रामसंघ खोली, आरोग्य विभागासाठी हिरकणी कक्ष, मराठी शाळा कंपाऊंड दुरुस्ती, पेविंग ब्लॉक बसवणे, शौचालय बांधने या विविध कामाचा शुभारंभ आपला बझारच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक, शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा  साधना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय गांधी योजनेची पेन्शन मंजूर झालेले पत्र वनिता सुभाष पाटील यांना देण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच सारिका पाटील, विश्वास कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, दिगंबर पाटील, हिम्मत पाटील, उमेश पाटील, मोहन पाटील, नारायण व अधिक चव्हाण, जि प शाळा मुख्याध्यापक माने सर, अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील बचत गटातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .