आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

 आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे.

तांबवे (ता. वाळवा) : नरसिंह मंदिर सभामंडप व संरक्षक भिंत बांधणे या 15 लाख रुपये कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृष्णा कारखाना संचालक संभाजी पाटील, विक्रमसिंह पाटील, सरपंच सुषमा भंडारे, उपसरपंच अवधूत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश जाधव, विक्रम चव्हाण, सोसायटी माजी अध्यक्ष अशोकराव मोरे, के. डी. शेळके, बाजार समितीचे माजी सदस्य तानाजी मोरे, राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपटराव जगताप, धोत्रेवाडी माजी सरपंच प्रदीप माने, मोहनराव जगताप, बालाजी जगताप, केशवराव सोसायटी माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, संभाजी, अनिल, सदाशिव, संजय, अवधूत, ओंकार, अनिल  दिलीप व संजय जाधव, शंकर तोडकर, विकास शेळके, हणमंतराव निकम आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर तांबवे येथे दत्त जयंती निमित्त महाप्रसाद होता. त्या ठिकाणी आमदार नाईक यांनी भेट दिली. या वेळी त्यांचा दत्त कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत सत्कार झाला. यावेळी वरील मान्यवर व मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .