इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 21 शाळांची निवड.
इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 21 शाळांची निवड.
इन्स्पायर अवॉर्ड नामांकन सन 2020- 2021 साठी जिल्ह्यातील 2203 उपकरणांची नामांकन करून नानाविध उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यापैकी 208 उपकरणांची निवड जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रदर्शनासाठी झालेली होती. यांची तज्ञ समितीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षण करून उत्कृष्ट 21 उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली आहे.
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत इन्स्पायर अवॉर्ड मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अधिकाधिक पाच विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असते. नवनवीन विचार संकल्पना तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी उपकरणे बनविणे अपेक्षित असते. त्यासाठी नामांकनातून निवड झालेल्या 208 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस मूल्य जमा करण्यात आले होते. त्या सर्वांना मार्गदर्शन शिक्षकांच्या वतीने उपकरणे तयार करून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धा सातारा येथील केबीपी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील चार तज्ञ मार्गदर्शक व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन चे चार तज्ञांनी मूल्यांकन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 208 उपकरणातून 21 उपकरणांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आले आहे.
आठ तज्ज्ञांची परीक्षणासाठी समिती
यामध्ये इन्स्पायर चे राज्य संचालक रविंद्र रमतकर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन च्या प्रियांका खोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य मोहन भोसले,प्रा.एम. बालाजी, प्रो. योगिता बाबर, प्रो. कस्तुरी पवार , नॅशनल इनोव्हेशनच्या मधुरा पाटील, प्रोजेक्ट असोसिएट, कुलदीप पंड्या, विधी जोशी यांच्या समितीने मूल्यांकन केले.
या कामासाठी शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम (माध्य ) , शिक्षणाधिकारी चौपटे साहेब (प्राथ) शिक्षण विस्तार अधिकारी मंगल मोरे मॅडम , मायावती शिंदे .जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे तसेच तज्ञ मार्गदर्शक प्रोफेसर एम बालाजी , प्रो योगिता बाबर ,प्रो कस्तूरी पवार , प्रो मोहन भोसले सर या सर्वांनी परिश्रम घेतले.
तालुकानिहाय यशस्वी विद्यार्थी व कंसात शाळा पुढीलप्रमाणे: जावळी - ओंकार गोळे ( एस.व्ही. डी. एम.व्ही. पंचक्रोशी, गांजे), सुरवसे (महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी) कराड- अनुराधा कोरडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुळसण), अस्मिता मोरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोडोली) खंडाळा वैष्णवी कानडे (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव), श्रावणी ढेंबरे (एम. इ. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळ), शिवराज पवार (वसंतराव पवार पाटील विद्यालय, शिवाजीनगर), खटाव-ओंकार जगताप (चंद्रसेन विद्यामंदिर धोंडेवाडी) कोरेगाव- शाहीद जमखिंडवाले (टी.बी.एम. इ. सी. ट्रस्ट विद्यालय, आझादपुर), महाबळेश्वर - प्रतिमा मर्ढेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा, भिल्लार), सानवी मोरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जावळी), पाटण- वेदांतिका काटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आवडे), सोहम सुतार (श्री क्षेत्रपाल विद्यालय आणि जुनियर कॉलेज, अडुळ ),फलटण- रुचिरा भोईटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंगणगाव), सातारा- सिद्धेश क्षिरसागर (श्री कोटेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, गोवे ), विशाल मोरे (साधना प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूल, कोडोली), देवदास जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, राजापुरी), श्रेयस मगदूम (सैनिक स्कूल, सातारा), वाई- शिंदे व रोहित शिंदे (मकरंद हायस्कूल, परकंदी), प्रतिक जाधव (ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, पसरणी).
Comments
Post a Comment