पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे .

 

पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे.

 ______महेंद्र लाड.

कार्वे प्रतिनिधी:-

 पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे असल्याची जाणीव ठेवून महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य सुरु असुन हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी व्यक्त केले.

तुपारी ता. पलूस ग्रामपंचायती मध्ये महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करणेत आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पलूस पंचायत समिती चे उपसभापती सुरेश खारगे, सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच सुनील पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेंद्र लाड पुढे म्हणाले की, धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने जी शिकवण दिली जाते त्यातून बंधुभाव निर्माण होऊन मानवता धर्माची जपणूक होते. तसेच पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड वसंवर्धनअभियानाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाज उपयोगी कार्याची माहिती देणेत आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .