GONDWANA NEWS BREAKING.

                          



                           ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.

                                  16डिसेंबर, गुरुवार


बेस्ट उपक्रमाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील २,२३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.


● निर्माता विक्रम धाकतोडेला शारिरीक शोषण अन् विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे 


● संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात; सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ; २५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस


● राज्यात ओमायक्रॉनचे आणखी चार रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या झाली ३२; दोन रुग्ण उस्मानाबाद, तर मुंबई आणि बुलडाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला


● फोन टँपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची व तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली


● मुंबई महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता; दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने निर्णय; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती 


● ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत; सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत; कायदेविषयक सल्ला घेऊन या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढील शुक्रवारी पुन्हा बैठक


● सरकारी नोकरभरती नामवंत कंपन्यांकडे; निवडभरती परीक्षेतील गोंधळानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय


● विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय, नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला; सभागृहाची मंजूरी मिळाल्यावर निर्णय प्रत्यक्ष अंमलात येणार 


● कुलगुरू निवडीत राज्यपालांच्या अधिकारांना कात्री; प्र-कुलपतीपदी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री; विद्यापीठ कायद्यांत लवकरच सुधारणा


● राज्यात ओमायक्रॉन रुग्ण संख्या वाढत असून जानेवारीत मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होईल; आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इशारा


● 'मिस युनिव्हर्स-२०२१' हरनाझ संधू मायदेशी; मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत; तब्बल २१ वर्षांनंतर हरनाझने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे 

 

● सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; २१ डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार! 


● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातींचा धडाका सुरुच; जीवरसयानशास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर


● अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका; CBI ला सर्व बाजूंनी तपास करण्याची हायकोर्टाची मुभा


● संदीप देशपांडे तुम्ही मला भावासारखे, योग्य वेळ आली की तुम्हाला प्रत्युत्तर देईन, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रुपाली पाटील यांचा मनसेच्या नेत्यांना इशारा 

 

● केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याने त्याविरोधात देशातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबर रोजी संपावर जाणार 


● आता किराणा दुकानात वाईन मिळणार, राज्य सरकार याबाबतची अधिसूचना काढण्याच्या तयारीत 


तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन, त्यांच्यावर बंगळुरुमधील रुग्णालयात सुरु होते उपचार


● कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका, फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .