बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड.
बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड.
कराड - प्रतिनिधी
पत्रकारांच्या अडीअडचणी आणि अन्यायाविरोधात झगडणाऱ्या निर्भीड अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी मानवाधिकार न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी, तडसर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांची निवड करण्यात आली.
महाजन यांची निवड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी ही निवड घोषित केली. निवडीचे पत्र नुकतेच कराड येथील पत्रकार संघटनेच्या बैठकीत दिलीप महाजन यांना देण्यात आले आहे. महाजन यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,ॲडव्हान्स खबर चे संपादक अंश खलीपे, उंब्रज येथील पत्रकार रवींद्र वाकडे, तिरंगा रक्षक शिराळा तालुका प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे, सांगली जिल्हा परिषद सदस्या एडवोकेट शांता कनूंजे, ओगलेवाडी येथील जेष्ठ पत्रकार दत्ता जंगम, कडेगाव येथील एडवोकेट कुलदीप महाजन, माजी पंचायत समिती सदस्य दीपक लिमकर, हजारमाची चे माजी उपसरपंच सूर्यभान माने, तिरंगा रक्षक चे सहसंपादक संपतराव मोहिते, वाळवा येथील ज्येष्ठ पत्रकार इक्बाल पिरजादे, कवठेमहांकाळ पत्रकार संघाचे आनंद वाघमारे आदींनी अभिनंदन केले. निवडीनंतर दिलीप महाजन म्हणाले, आज पर्यंतच्या दीर्घ काळातील पत्रकारितेचा अनुभव हा पत्रकारांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी करू, आणि संघटनेची बांधणी योग्यरीत्या करून लवकरच सांगली जिल्ह्यात अधिवेशन घेण्याचा आमचा मानस आहे.
Comments
Post a Comment