प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

 प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.


कार्वे प्रतिनिधी : प्रविण पाटील

प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन औरंगाबाद च्या वतीने औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे हा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

             औरंगाबाद येथील हॅपी टू हेल्प फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक  ,तसेच निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यासाठी प्रस्ताव व निबंध मागवण्यात आले होते.त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षकांनी भाग घेतला होता. कमिटी तर्फ शिक्षकांची निवड करून   ४ राज्यस्तरीय ,१० जिल्हास्तरीय व निबंध स्पर्धेतील ७ असे एकूण २१ सत्कार मूर्तींचा  सत्कार फौंडेशन ने मान्यवरांच्या हस्ते केला.प्रदिप कुंभार यांची  मराठी माध्यम जिल्हा परिषद शाळा गटातून एकमेव निवड राज्यस्तरावर करण्यात आली. हॅपी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम व त्यांच्या संपूर्ण टीम ने सोहळ्याचे भव्य  आयोजन केले होते.

            प्रदिप कुंभार हे जि प शाळा शेरे येथे कार्यरत असून त्यांनी लॉक डाऊन मध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले होते.शाळेतील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ऑनलाईन टेस्ट ,शैक्षणिक व्हिडीओ,नवोपक्रम,सामान्य ज्ञान स्पर्धा घेतल्या होत्या. शिक्षकांना व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.शिक्षक मंच सातारा,महाराष्ट्र admin पॅनल,सर फाउंडेशन सातारा च्या साहाय्याने विविध स्पर्धा,ऑनलाईन टेस्ट,शैक्षणिक व्हीडीओंची निर्मिती,शालेय रंगरंगोटी ,100% शाळा डिजिटल त्यांनी केली होती.नुकताच त्यांना सातारा जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊनही सन्मानित केले होते.त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .