GONDWANA NEWS BREAKING.
ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.
दिनांक २१ डिसेंबर, २०२१, मंगळवार.
● राज्य सरकारचा मोठा निर्णय; टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित
● ओबीसी आरक्षण, परीक्षा गैरव्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, बुधवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
● विविध वित्तीय संस्थां, उद्योगांच्या माध्यमातून राज्याचे वैभव गुजरातला पळविले; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर
● मुंबई : पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या मात्र बस बंदच, विद्यार्थ्यांचे हाल; वाहतूक साधनांची कमतरता, एसटी संप आणि लोकलमधील वाढत्या गर्दीचा फटका
● पुणे : वाहन क्रमाकांच्या पाटीतील बदलांमुळे शिस्तप्रिय वाहनचालकांना मनस्ताप; ई-चलन कारवाईबाबत आठ हजार वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांकडे तक्रारी
● कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : कागलमधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील चार उमेदवारांनी माघारी घेतल्याने त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड
● वर्धा : श्वानांनाही मिळतंय रक्तदानानं नवजीवन; रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्राने दिले सात महिन्याच्या ओरिओला जीवदान
● इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय; अधिसूचना केली जारी
● भारतासह जगभरात 'ओमायक्रॉन'च्या रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ; पुढील महिना सर्वाधिक धोकादायक; ओमायक्रॉन व्हेरियंटवर वैज्ञानिकांचा इशारा
● परभणीत सुरू झालेल्या ३२ व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाणे आणि पालघर संघांच्या अनुक्रमे मुले आणि मुलींची विजयी सलामी
▪️ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उभी फूट! एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार
▪️ एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
▪️ राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर ५४४ नव्या कोरोनाबाधितांची भर
▪️ पनामा पेपर लिकप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची तब्बल ५ तास ईडीकडून चौकशी; ऐश्वर्याला अनेक प्रश्नांचा करावा लागला सामना
▪️ रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान, प्रचाराच्या तोफा थंडावल्या, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
▪️ सोलापुरात प्रथमच मशिदीत कोरोना लसीकरण; महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केली प्रशंसा
▪️ पोलीस भरतीमध्ये पेपर फुटीचा किंवा कुठलाही गैरप्रकार घडलेला नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य
▪️ ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन; कोल्हापूरातील कला क्षेत्राबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होतं
▪️ दिल्ली सरकारने मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवला, पुढील ६ महिने मिळणार मोफत रेशन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
▪️ टीईटी परिक्षा गैरव्यवहारप्रकरणी तुकाराम सुपेंच्या घरी सापडली १ कोटी ५८ लाखांची रोकड; पुणे पोलिसांची माहिती
Comments
Post a Comment