GONDWANA BREAKING NEWS.
दिनांक ०२ डिसेंबर, २०२१,
● काळाचौकी बाळ चोरी प्रकरणात आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार, आरोपी महिलेचा शोध सुरु
● मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित
● राज्याच्या निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप; हवाई प्रवाशांबाबतच्या नियमांत सुसंगती राखण्याची सूचना
● मुंबई, ठाण्यासह राज्यात हिवाळी पाऊस; भाज्यांना फटका; किरकोळ बाजारात भाव शंभरीपार; कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला
● मालमत्तेसाठी वृद्ध मातापित्याच्या छळवणुकीत वाढ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; गायिका श्वेता शेट्टीला वडिलांचे घर सोडण्याचे आदेश
● राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबर रोजी स्वराज्याच्या राजधानीवर येणार असल्याने रायगडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली; सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली असली तरी नाराजी व्यक्त होत आहे
● आफ्रिकेतील देशांमधून मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी तीन प्रवाशांना कोरोनाची बाधा; मुंबईत एकूण चार कोरोनाबाधित प्रवासी झाले असून यांना मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे
● एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू; नवनियुक्त ते दहा वर्ष कालावधी झालेल्यांना पाच हजार रुपये वाढ; कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच; बुधवारी ४४८ कर्मचारी निलंबित
● राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीत घट; ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ७०० कोटी कमी; चालू आर्थिक वर्षांत एप्रिलमध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींची वसुली झाली होती
● मालेगाव बॉम्बस्फोट खटला : ‘एटीएस’ची तातडीने मदत घ्या; साक्षीदार फितूर होत असल्याने मृतांच्या कुटुंबीयांची एनआयएकडे मागणी
● देशभरातील आयआयटीमध्ये बुधवारपासून नोकरीसाठीच्या मुलाखतींचे पर्व (कॅम्पस प्लेसमेंट) सुरू; पहिल्याच दिवशी कोट्यावधी रुपयांच्या वेतनाचे प्रस्ताव विद्यार्थ्यांना मिळाले
● देशात गेल्या तीन वर्षांत एकूण १ हजार ३४ दहशतवादी हल्ले झाले; हल्ल्यांमध्ये एकूण १७७ जवान शहीद झाले; त्यापैकी १ हजार ३३ हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले. तर, एक हल्ला दिल्लीत झाला
▪️ अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाची जोरदार हजेरी; तर राज्यात पुढील २४ तासांत पाऊस बरसणार असल्याची शक्यता
▪️ राज्यात काल विविध ठिकाणी शाळांची घंटा वाजली; तर मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
▪️ गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ! व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची वाढ, व्यवसायिक सिलिंडरच्या किमती आता २१०० रुपयांच्या घरात
▪️ सहकारी बँकांच्या भरतीत घराणेशाहीला रोखण्यासाठी राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय; राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या नोकरीमध्ये संचालकांच्या नातेवाईकांना बंदी असणार
▪️ भीमा कोरेगाव एल्गार परिषदेप्रकरणी सुद्धा भारद्वाज यांना जामीन मंजूर; न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं निकाल जाहीर केला.
▪️ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर; आत्मनिर्भर गुजरातचा नारा देत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल महाराष्ट्रात येणार
▪️ वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? वीज वापरतात मग बिल भरायला का नको, उर्जामंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य
▪️ ट्विटरचे नवीन नियम लागू; ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्यास बंधने
▪️ ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याच्या राज्यांना सूचना; केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना लिहिलं पत्र
▪️ ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सेवेचा निर्णय स्थगित, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Comments
Post a Comment