जिल्ह्यातील 163 सोसायट्यांचा प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम जाहीर.
जिल्ह्यातील 163 सोसायट्यांचा प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम जाहीर.
कराड तालुक्यातील ४३ सोसायट्यांचा समावेश
कराड : प्रतिनिधी
कराड तालुक्यातील ४३ सोसायट्यांचा प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम 2014 चा नियम 4 (11) नुसार "ब" प्रवर्गातील संस्थांच्या प्रारुप मतदार यादीचा अद्यावतीकरण कार्यक्रम मा. सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 26/11/2021 रोजीच्या परिपत्रक सूचनेनुसार प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी आज बुधवार 8/12/2021 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित संस्था कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. तसेच प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती/आक्षेप दाखल करण्यासाठी आजच 8/12/2021 ते 17/12/2021 रोजीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांच्या कार्यालयातील निवडणूक कक्षात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्राप्त दावे व हरकती/आक्षेप यावर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा हे 24/12/2021 रोजी त्यांच्या कक्षात प्रसिद्ध करणार आहेत. तसेच अंतिम मतदार यादी त्याच दिवशी 24/11/2021 रोजी संबंधित संस्था कार्यालय, उप सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
तालुक्यातील या सेवा सोसायट्यांमध्ये तारुख विकास सेवा सोसायटी लि. तारुख ता. कराड, रयत विकास सेवा सोसायटी (चरेगाव), सुपने विकास सेवा सोसायटी (सुपने), महाकाली विकास सेवा सोसायटी (विजयनगर), इंदोली विकास सेवा सोसायटी (इंदोली), बेलवडे विकास सेवा सोसायटी (बेलवडे बुद्रुक), सिद्धेश्वर विकास सेवा सोसायटी (शामगाव), कोपर्डे हवेली विकास सेवा सोसायटी (कोपर्डे हवेली), मरळी ग्राम विकास सेवा सोसायटी (मरळी), तासवडे विकास सेवा सोसायटी (तासवडे), कवठे विकास सेवा सोसायटी (कवठे), किरपे विकास सेवा सोसायटी (किरपे), आणे विकास सेवा सोसायटी (आणे), लोकमान्य विकास सेवा सोसायटी (उंब्रज), नडशी विकास सेवा सोसायटी (नडशी), वडोली भिकेश्वर विकास सेवा सोसायटी (वडोली भिकेश्वर), पेरले ग्रामीण विकास सेवा सोसायटी (पेरले), टेंभू-सयापुर विकास सेवा सोसायटी (टेंभू), रिसवड-अंतवडी विकास सेवा सोसायटी (रिसवड), काले गट नंबर 2 विकास सेवा सोसायटी (काले), मनु ग्राम विकास सेवा सोसायटी (मनु), शिरगाव विकास सेवा सोसायटी (शिरगाव) या सोसायट्यांचा समावेश आहे.
तसेच शिरवडे विकास सेवा सोसायटी (शिरवडे), श्री लक्ष्मीदेवी विकास सेवा सोसायटी (मलकापूर), कोर्टी नंबर 1 विकास सेवा सोसायटी (कोर्टी), येरवळे विकास सेवा सोसायटी (येरवळे), सैदापूर विकास सेवा सोसायटी (सैदापूर), हिंगनोळ विकास सेवा सोसायटी (हिंगनोळ), पाल विकास सेवा सोसायटी (पाल), चोरे विकास सेवा सोसायटी (चोरे), नांदगाव विकास सेवा सोसायटी (नांदगाव), भैरवनाथ विकास सेवा सोसायटी (आटके), कोणेगाव विकास सेवा सोसायटी (कोणेगाव), बेलवडे हवेली विकास सेवा सोसायटी (बेलवडे हवेली), कालवडे विकास सेवा सोसायटी (कालवडे), धोंडेवाडी विकास सेवा सोसायटी (धोंडेवाडी), करवडी विकास सेवा सोसायटी (करवडी), कोरीवळे विकास सेवा सोसायटी (कोरीवळे), तळबीड विकास सेवा सोसायटी (तळबीड), तांबवे ग्रुप विकास सेवा सोसायटी (तांबवे), कापील विकास सेवा सोसायटी (कापील), केदारलिंग विकास सेवा सोसायटी (रेठरे खुर्द) आणि वाठार विकास सेवा सोसायटी (वाठार) या सोसायट्यांचाही सदर प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रमामध्ये समावेश आहे.
Comments
Post a Comment