अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना अधिस्विकृती समीतीवर घ्या-विलास मराठे.

 अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना अधिस्विकृती समीतीवर घ्या-विलास मराठे.

'संघाच्या दिनदर्शीकेचे विमोचन.'

कराड : ज्ञानेश्वर शेवाळे.

    ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती कार्ड देण्यात यावे असा ठराव यदु जोशी  यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या तत्कालीन राज्याच्या अधिस्विकृती समीतीने सर्व संमतीने घेऊन शासनाकडे पाठविला असतांनाही त्याला शासनाने अद्याप मान्यता दिली नाही या बाबत खंत व्यक्त करुन ग्रामीण पत्रकारांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना शासनाच्या अधिस्विकृती समीती मध्ये समावेश करण्याची मागणी दै.हिन्दुस्थानचे संपादक व आय.एन.एस.या केंद्रिय संपादकांच्या संस्थेचे सदस्य विलास मराठे यांनी केली.ते बहुजन चळवळ व अ.भा.ग्रामिण पत्रकार संघाच्या  सन २०२२ च्या दिनदर्शीकेच्या विमोचन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

   अमरावती येथील प्राईम पार्क येथील सभागृहात पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेच्या विमोचन समारंभ बुधवारी पार पडला.यावेळी अध्यक्ष स्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने,तर प्रमुख अतिथी दै.हिन्दुस्थानचे संपादक विलास मराठे,पुर्वाश्रमीचे पत्रकार व विद्यमान भाजपाचे राज्य प्रवक्ता शिवराय कुळकर्णी,दै.हिन्दुस्थान परिवाराचे सर्वेश मराठे,प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा,वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापु देशमुख,कार्याध्यक्ष  युसुफखान पठाण,सविव अशोक पवार,उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,कोषाध्यक्ष अशोक याऊल,मनोरह चरपे,माणिक ठाकरे,प्रा.रविंद्र मेंढे,बाळासाहेब स्वरगीवकर,प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे,राजेंद्र ठाकरे,निलेश राजस आदींची उपस्थिती होती.

   यावेळी भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी अ.भा.ग्रामिण पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करुन ९ जानेवारीला होणार्‍या अधिवेशनाला शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जयराम आहुजा व नानक आहुजा यांनीही पत्रकार संघाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

  संघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक.

 यानंतर पत्रकार संघाच्या केंद्रिय पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.यात संघाचे अधिवेशन तारीख तांत्रिक अडचणीमुळे ९ जानेवारी रविवार करण्यात आली.यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय मंत्री नितिन गडकरींना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी हिन्दुस्थानचे संपादक विलास मराठे,भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी वृत्तकेसरीचे जयराम आहुजा यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन,व भरारी स्मरणीकेचे नियोजना संबंधी चर्चा करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .