GONDWANA NEWS BREAKING .
ब्यूरो रीपोर्ट - शकूर मुल्ला.
दिनांक २९ डिसेंबर, २०२१, बुधवार.
● कंत्राटदार बदलले, गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणार, एकनाथ शिंदेचे विधानसभेत आश्वासन
● विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले
● ड्रग्ज तस्करीत उच्चभ्रू घरातील गृहिणी; वर्षभरात २३० जणांवर कारवाई
● कुपवाडमध्ये प्रेमी युगुलांची गळफास घेवून आत्महत्या, सावर्डे पाठोपाठ कुपवाड हादरले
● थरार! चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली
● विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट; नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे संकट
● राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती केली जाणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा
● मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती
● शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप घातक; विरोधकांचा आक्षेप; विधानसभेत विरोधानंतरही गोंधळात विद्यापीठ विधेयक मंजूर
● वाहन परीक्षकांवरच एसटी चालवण्याची जबाबदारी; एसटी महामंडळाचा लवकरच निर्णय; एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती
● आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या कंपनीने प्रश्नपत्रिका फोडल्याचा संशय; दोन दलालांना अटक, नायसा कंपनीचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात
● राज्यात साखर निर्मितीत सहकारी-खासगी कारखाने बरोबरीत; ९४ सहकारी तर ९३ खासगी कारखान्यांमध्ये मिळून ३७९ लाख क्विंटल साखर उत्पादन
● पेन ड्राईव्ह, कागदपत्रे मुंबई पोलिसांना सुपूर्द करा; फोन टॅपिंग प्रकरणी न्यायालयाचे केंद्रीय गृह मंत्रालयाला आदेश
● देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला मिळाले नवे बळ; केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाची कोव्होव्हॅक्स व कोर्बिव्हॅक्स या लशींच्या आपत्कालीन वापरास परवानगी
● भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका: शमीपुढे आफ्रिकेची घसरगुंडी; पहिल्या कसोटीत भारतीय संघ १४६ धावांनी आघाडीवर
▪️ राज्यभरात आज दिवसभरात २ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; तर १ हजार ९८ रूग्ण करोनामुक्त झाले
▪️ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारीत होणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
▪️ संतोष परब हल्ला प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी
▪️ एमपीएससीची २ जानेवारीला होणारी पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलली, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
▪️ माझ्या मनात गांधींविरुद्ध तिरस्कार आहे, मी गांधींचा द्वेष करतो, कालीचरण महाराजांनी व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली
▪️ शासकीय भरतीमध्ये सामाजिक समांतर आरक्षणासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती
▪️ महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
▪️ मनमाडजवळ किसान एक्सप्रेसचे २ डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत
▪️ राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘टी-३५’ वाघिणाचा मृतदेह आढळला, व्याघ्र प्रकल्पातील सालेघाट रेंजमधील पाथर बीटमधील पाहणी दरम्यान आढळला मृतदेह
▪️ राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; अधिवेशनात उपस्थित राहिल्याने वाढली चिंता
▪️ पंढरपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना! सासऱ्याने सूनेबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल
https://youtu.be/ZxvUkZm8d-w
Comments
Post a Comment