Posts

Showing posts from 2019
Image
  तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रज्योत चोपडे उपविजेता. " कुस्ती क्रीडा प्रकारात साळशिरंबे जि.     प.शाळेचे  उज्ज्वल यश  " कराड-(प्रतिनिधी )      तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच कराडमध्ये संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये विविध  वजन गटानुसार कुस्तीच्या लढती पार पडल्या .यामध्ये जिल्हा परिषद शाळा साळशिरंबे  शाळेचा विद्यार्थी प्रज्योत प्रवीण चोपडे याने ३५किलो वजनी गटात उपविजेता म्हणून स्थान मिळवले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच,ग्रामस्थ यांचे कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Image
बाबा रामदेव यांच्या विरोधात भीम आर्मी सातारा जिल्हा  यांच्यावतीने  दिले निवेदन . "आक्षेपार्ह विधानाबद्दल त्वरित अटक करुन कारवाई करण्याची केली मागणी . "  बाबा रामदेव यांच्या विरोधात निवेदन देताना भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे व पदाधिकारी. प्रतिनिधी - भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या वतीने बाबा रामदेव यांच्या विरोधात त्वरित अटकेची कार्यवाही करावी यासाठी निवेदन दिले. बाबा रामदेव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पेरियार यांच्या अनुयायांना  बौद्धिक आतंकवादी (इंटेलेक्च्युल टेररिस्ट ) असा  शब्द प्रयोग केला याचे निषेधार्थ त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने भारतभर निषेध आंदोलन उभे केले आहे याच धर्तीवर सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निषेध करण्यात आला त्याच बरोबर बाबा रामदेव यांच्यावर त्वरित अटकेची कारवाई  करावी म्हणून निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना हे निवेदन देण्यात आले त्या वेळेला भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे ,इम्रान मुल्ला (सुशिक्षित बेरोजगार  महासंघ  जिल्हाध्यक्ष ),सागर कु...
Image
प्रस्थापित पक्षांकडे बहुजन मतं वळतील का ?   अनुसूचित जाती, जमाती,व इतर मागास प्रवर्ग यांची बहुसंख्य मते परंपरागत पक्षाकडे वळतील का ??? प्रतिनिधी- भारताच्या लोकशाही मध्ये कोणीही जनतेपेक्षा मोठे नाही जनता सर्वश्रेष्ठ आहे यालाच लोकांनी लोकांच्या साठी चालवलेला लोक राज्य म्हणून ओऴखल जात, आणि या भारताचा खरा राज्यकर्ता आहे तो बहुजन समाज जो वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला पण  मूळ उगम एकच आहे. पण काळाच्या ओघामध्ये झालेल्या बुद्धी भेदामुळे त्यांना त्यांची खरी ओळख अजूनही मिळालेली नाही. अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील लोक लोकसंख्येनं बहुसंख्य आहेत पण जात गटांमध्ये विभागल्यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी जाणवत आहे . बहुजन समाजामध्ये सुशिक्षित व तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या मार्गावर आणि भारतीय संविधानावर वाटचाल करण्याची इच्छा आणि ऊर्मी त्यांच्यात अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे.आजपर्यंत सत्ताधारी पक्षांनी कशा पद्धतीला बहुजन समाजाची मते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरली आणि त्या लोकांचा सामाजिक व...

लोकशाहीने समृद्ध असलेल्या भारतात आजही पाळली जाते जातपात .

Image
 लोकशाहीने समृद्ध असलेल्या भारतात आजही पाळली जाते शुद्र मानसिकता जाती -पातीची  . शिक्षण क्षेत्रात  ही शूद्र  मानसिकता बहुजन समाजासाठी घातक. कराड - प्रा.( डॉ) विनोद कांबळे. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय ,समता, स्वातंत्र्य, बंधुता, या गोष्टी प्रदान केलेल्या दिसून येतात. त्यातच सामाजिक मागास असलेल्या लोकांच्यासाठी विशेष अशा तरतुदी केलेल्या दिसून येतात.त्यात बदल करणे शक्य नाही.त्या लोकांना विकासाच्या  मुख्य प्रवाहात आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि त्यांना सहकार्य करणे आणि संविधानात्मक धोरण अवलंबणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.असे असतांना देखील अलीकडच्या काळामध्ये अतिशय शुद्र मानसिकतेचे काही लोकसेवक आपलं कर्तव्य बजावताना दिसतात. आणि बहुजनांच्या उद्धाराचे एकमेव क्षेत्र असलेल शिक्षण क्षेत्र हे या मानसिकतेने बाधित  झाल ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे  असा त्यातून अर्थ काढता येईल की या मानसिकतेला बहुजन उद्धाराच क्षेत्र हे संपवायचा आहे. मग त्यात बहुजन समाजाचे असणारे शिक्षक व विद्यार्थी हे  बळी दिले जातात. आणि त्यांना मुख्य ...
Image
बहुजनांच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी सदैव तत्पर.. महाराष्ट्रराज्य  उपाध्यक्ष मा. उत्तरेश्वर कांबळे. कराड- (प्रतिनिधि) भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथे शासकीय विश्रामगृहात  दक्षिण कराड व उत्तर कराड भीमआर्मीच्या प्रमुख पदाधिका-यांची महत्त्वाची मिटींग पार पडली.  भीम आर्मीचा प्रमुख उद्दिष्टानुसार संविधानात्मक मार्गाने बहुजनांच्या हक्कासाठी लढा उभारण्यासाठि   शपथ घेण्यात आली ,त्यात बनवडी येथील डवरी गोसावी समाज बांधवांच्या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे भीम आर्मीचे उपप्रमुख यांनी न्याय मिळत नाही तो पर्यंत भीम आर्मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असेल असे अभिवचन दिले. या मिटींगच्या वेळी उत्तरेश्वर कांबळे भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  जिल्हा प्रमुख संतोष थोरवडे,कराड द.प्रमुख भागवत कांबळे आदी पदाधिकारी...!
Image
अनुसूचित जाती, जमाती, व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  शैक्षणिक शिष्यवृत्ती.. खरंच या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ होतोय ?????   प्रा.  (डॉ) विनोद कांबळे -     शासनाने शैक्षणिक दर्जा वाढावा व बहुजन समाजाला ज्ञान मिळावे यासाठी  त्याला अर्थसाहाय्य व्हावे म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली अाहे,आणि प्रत्येक शिष्यवृत्तीचा प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य व्हावे,त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात त्यांना शैक्षणिक प्रवाहांमध्ये येण्यास सुकरता व्हावी.एवढा प्रगल्भ विचार शासनाने स्वीकारलेला आहे. कोट्यावधी रुपये त्यावर खर्च केले जाताहेत. सर्व शैक्षणिक संकुलाला शिष्यवृत्ती दिली जाते मग ते अनुदानित असो व  विनाअनुदानित असो.काही शैक्षणिक संकुलात आरक्षणाप्रमाणे विना फी सर्व आरक्षित विद्यार्थी प्रवेशित केले जातात तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अगोदरच फी भरावी लागते किंबहुना त्यांच्याकडून ती भरून घेतली जाते. भारत हा खेड्यात राहातो जवळजवळ ७०% लोक खेड्यात राहतात.ग्रामीण भागात कृषी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे बहुतांश...
Image
विश्वजित पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत शिवसेनेचा पक्ष विस्तार सुरू .    प्रतिनिधी - उंडाळे विभागातील वडाप वाहतुकदारांनी विश्वजीत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा विकास पाटील (माजी ग्रामपंचायत सदस्य साऴशिरंबे)सुशील चवरे,धनाजी साठे,वाल्मिक साठे,किरण देसाई, नवनाथ  (साळशिरंबे)  देवदत्त कुंभार ,मिथुन कांबळे(उंडाळे),  हरिभाऊ काटेकर (येवती ) विशाल माळी, गणेश  पोळ,प्रवीण लादे, सागर थोरात, संकेत थोरात, बाळासो थोरात,(अोंड) वसंतराव पवार (नांदगाव ) शहाजी पवार ,पुंडलिक काकडे (धोंडेवाडी ) तात्या माने ,भरत सप्रे, रमेश साळुंखे   ( महारुगडेवाडि)अनिल वाळके, हंबीरराव बागल , मोहन शेवाळे, अधिकराव उमराणी , (अकाईवाडी) राजाराम शेवाळे (उंडाळे ),पंढरीनाथ सावंत,(सावंतवाडी )यांच्यासह ३० ते ४० सहकारि उपस्थित होते.        उंडाळे विभागातील वडापधारक सोबत कराड दक्षिण  शिवसेना युवा अध्यक्ष विश्वजित पाटील 

साप्ताहिक तिरंगा रक्षक उद्घाटन समारंभ .

Image
             साप्ताहिक तिरंगा रक्षक उदघाटन समारंभ 

EP-659- चुनाव आयोग ने गायब किये राहुल गाँधी के 6 लाख वोट; सबसे बड़ा ख़ुलासा

Image
Image
*मा. खासदार असुद्दीन ओवैसी. हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..* 1) अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव.* 2) ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात.* 3) असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात.* 4) महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा नेते असताना लाखोंचे मोर्चे निघून पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. पण हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल.*  5) गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्य...

सभेसाठी जमणाऱ्या गर्दीचे मतात रूपांतर होणारच.

Image
 सभेसाठी जमणाऱ्या गर्दीच परिवर्तन मतात नक्की होणार आणि ते मी करणारच –  मा.प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा सध्या राज्यभरात गाजत आहेत. सभेला येणारा प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र सभेला येणारी गर्दी ही मतदानात परावर्तित होत नसते म्हणून विरोधकांकडून टीका होत आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विरोधकांकडून सतत आरोप केला जात होता की, सभेत येणारी गर्दी ही मतात परावर्तित होत नसते. यावर बोलताना आंबेडकर यांनी सांगितले की जी गर्दी स्वतःहून आणि स्वतःच्या पैशाने येत असते ती मतांमध्ये देखील परावर्तित होत असते. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी लाटेच राजकारण पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्यावेळी देखील त्यांची लाट होती गर्दी जमायची आणि त्याच गर्दीच रूपांतर मतात ही झालं. ते म्हणाले की, वी.पी सिंग यांच्या सभेला सुद्धा गर्दी ज...
Image
"अनुसूचित जाती जमातीला"आजही न्यायासाठी करावी लागते कसरत. "लोकसेवक" आजही करतात "पुढाऱयांच्या" सल्ल्याने कायदेशीर कारवाई. प्रा.विनोद कांबऴे. भारतीय संविधान हे न्याय, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, या तत्त्वावर आधारित आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही आज अनुसूचित जाती, जमाती, या प्रवर्गाला न्यायासाठी कसरत करावी लागत आहे. अगोदरच गरिबी ,अज्ञान, आणि मनात एक प्रकारची असणारी दहशत या गोष्टींमुळे न्यायप्रविष्ट बाबींच्या कडे लोकांचा जाण्याचा कल हा मंदावलेला दिसतो.हे स्वतंत्र भारतामध्ये का दिसतात भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले असतानाही ही परिस्थिती का निर्माण होते. का म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलं जातं ,किंबहुना त्याप्रमाणे वर्तन केले जात. भारतीय लोकशाही मध्ये मानवी विकास हा काय धरला जातो आणि सगळे लोक हे त्यामध्ये ग्राह्य धरले जातात. मग याच प्रवर्गाची कुचंबना का होते. आज जे अनुभवले ते डोकं सुन्न करणारा होत. एक विशीतला तरुण  पायांन चाळीस टक्के अपंग आई नाही ...

बहुजन समाज जागा झालाय.

Image
वंचित बहुजन आघाडीचा कराड तालुक्यात बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू  प्रतिनिधी-  सातारा लोकसभा निवडणूकाच्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी चे सातारा जिल्हा युवक उपअध्यक्ष मा अजय संजय पोळ तसेच कराड तालुका युवक अध्यक्ष मा अमोल झिमरे यांनी  तुळसण ता कराड (दक्षिण) येते वंचित बांधवाना एकत्र घेऊन  सातारा लोकसभा व अधिकृत उमेदवार मा.ऐवळे साहेब यांचा बद्धल माहिती देऊन  पक्षाचे ध्येय  धोरणे त्यांनी सांगितले तसेच कामाची रूपरेषा सांगितले व मोट्या प्रमाणावर एक संघ होण्यासाठी युवक उप जिल्हा अध्यक्ष पोळ  यांनी लोखाना सांगितले तसेच त्यावेळी तुळसण मधील बहुजन मूळनिवासी नायक, तसेच  प्रतिष्ठित व्यक्ति ही बहुसंखेने उपस्थित होते. सतीश गोतपागर,विशाल गावडे, धोंडीराम गोतपागर,(माजी ग्रामपंचायत सदस्य),आनंदा गावडे, नितीन गोतपागर  भीमराव गावडे . x
महाविद्यालयीन शिक्षणाची उद्दिष्टे समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं . महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शनाची गरज. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बदलतेय मानसिक ता. प्रतिनिधी : - सुदृढ आणि मजबूत मानसिकतेचा तरुण  सक्षम समाज घडवू शकतो.महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आज अमुलाग्र बदल दिसून येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची उद्दिष्टे आणि तरुण विद्यार्थ्यांची मानसिकता, प्रशासनाचा सामाजिक विकासाचा मानसिक दृष्टीकोन ,या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. भारताचे उद्याचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शनाची गरज आहे .हे संस्कार महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीमध्ये होण गरजेच आहे . महाविद्यालयीन तरुणांची बदलती मानसिकता समाजव्यवस्थेमध्ये होणारे बदल, आधुनिकता, या सगळ्यांच्या पाठीमागून येणारा सांस्कृतिक बदल यामुळे    समाजाचा खरा विकास यांचं चित्र कुठंतरी धुसर होताना दिसत आहे.याचे परिणाम सर्वत्र दिसून येतात त्यामध्ये राजकीय ,शैक्षणिक ,आणि सामाजिक या सगळ्या व्यवस्था प्रभावित होताना दिसतात.जर वेळीच या महाविद्यालयीन तरुणांना भावी भारताच्या अाधारा...