Posts

Showing posts from March, 2020
Image
उंडाळे विभागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी. " संचारबंदी मोडणारावर केली कारवाई."     उंडाळे - प्रतिनीधी  (प्रदीप पाटील ) राज्यात सर्वत्र संचारबंदी दरम्यान पोलिसांनी नागरिकांवर  कायद्याचा बडगा  चालवलाय. संचारबंदीतही अतिशाहण्या लोकांना पोलिस  चांगलीच समज देताना दिसतायेत. भुरभुशी ता.कराड येथे परिसरातील अतिशाहण्या युवकांना  पोलिसांनी आपला हिसका दाखवलाय.  कोरोना पासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागु केली असुन उंडाळे परिसरात पोलीस प्रशासनाकडुन विशेष प्रयत्न केले जात आहेत मात्र संचारबंदीला झुगारून काही नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मंगळवारी उंडाळे परिसरात   गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्या निदर्शनास भुरभुशी ता.कराड येथील रस्त्यावर काही तरूण संचारबंदीचे उल्लघंन करताना आढळुन आले असता तत्काळ त्यांनी या रस्यावर फिरणार्‍या रस्त्यातच उठा बसा काढायला लावल्या आणि पोलीसी खाक्या दाखवला तेंव्हा कुठे या परिसरातील बहुतांशी युवकांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी अशा लोकांविरोधात...
Image
उंडाळे ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात केली औषध फवारणी. " कोरोना या साथीच्या रोगाला प्रतिबंधक उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात केली औषध फवारणी ." उंडाळे-प्रतिनिधी  (प्रदीप पाटील) उंडाळे ग्रामपंचायतीच्या वतीने "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू केल्या असून रविवारी उंडाळे गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत  प्रत्येक  वॉर्ड , भाजी पाला कट्टा , मारुती मंदीरच्या परिसर मध्ये फवारणी करण्यात आली.    उंडाळे ता.कराड येथील नागरी वस्तीत फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांची होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्यात  भीतीचे वातावरण निर्माण होऊन विविध उपाययोजना करण्याचा दृष्टीने ग्रामपंचायतने पावले उचलली आहेत. शनिवार, रविवारी सकाळी ,संध्याकाळ ग्रामपंचायत कर्मचा-यामार्फत  फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच दादासो पाटील,  ग्रा.पं.सदस्य बापुराव पाटील उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते भवानी मंदीर परिसरापर्यंत  फवारणीचे काम सुरू करण्यात आले त्यानंतर दिवसभरात सर्व नागरी वस्तीमध्ये फवारणी...
Image
उंडाळे परिसरात कडक संचारबंदी , उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई. उंडाळे -रत्नागिरी मार्गावर   बॅरिकेट्स  लावुन वाहनाची तपासणी करताना उंडाळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी . उंडाळे - प्रतिनीधी (प्रदीप पाटील) ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक  यांनी दिली. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात कोरोनाबाधित रुग्ण आढळून  आल्यानेआता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक  यांनी दिली. त्याच अनुशंगाने उंडाळे -रत्नागिरी मार्गावर   बॅरिकेट्स  लावुन वाहनाची तपासनी केली जात असुन  अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा वाहने वगळता कोणीही रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उंडाळे पोलीस दलाकडुन  स्पष्ट केले आहे. ...
Image
 विराज थोरात याचे N.M.M.S. परीक्षेत यश. स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर  उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळेचा विद्यार्थी. उंडाळे-( प्रतिनिधी )  केंद्र सरकार सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वा. दादासाहेब उंडाळकर उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळेचा  आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी विराज जयवंत थोरात याने यश संपादन केले. डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .  परीक्षा केंद्र शासनातर्फे  राज्याच्या शैक्षणिक विभागांकडून आयोजित केली  जाते. प्रत्येक प्रवर्गनिहाय या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो . त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये जिल्ह्यातील परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त ४५ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले . यामध्ये  विराजला १८ वा गुणानुक्रम प्राप्त झालेला आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरामधून त्याचे कौतुक होत आहे. या त्याच्याबद्दल विद्यालयाचे  मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले . ...
Image
  स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य याविषयी व्याख्यान संपन्न. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. सुरेश राजपूत. कराड-( प्रतिनिधी)   महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जीवन व कार्य या विषयावर प्रा .सुरेश विष्णू रजपूत यांनी व्याख्यान दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ आठवणी त्यांचे कार्य लहान मुलांना त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल अशा स्वरूपात सादर केले  .यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक ,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
विद्यार्थ्यांनी कला व क्रिडा क्षेत्रांमध्ये सहभाग घ्यावा . प्रो.डॉ. सतीश घाटगे.    उंडाळे -(प्रतिनिधी)     कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे मध्ये  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रो.डॉ. सतीश घाटगे (प्रभारी प्राचार्य काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले) हे उपस्थित होते. ते म्हणाले " विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबर कला व क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग घ्यावा. पुस्तकी ज्ञानाबरोबर बाह्य ज्ञान देखील आवश्यक आहे, ते घेतले तरच विद्यार्थी समाजामध्ये टिकू शकेल."     मा. श्री जयसिंगरावजी पाटील (बापू) (अध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे ) अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणामध्ये बापू म्हणाले ' "विद्यार्थ्यांनी पालकांचे स्वप्न पूर्ण करावे. सर्व गुरुवर्याच्या आज्ञेमध्ये राहून सर्वांगीण विकास साधावा. मा. श्री बाबुराव यादव (सचिव ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे ) प्रमुख उपस्थिती मध्ये होते.        यावेळी सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्...
Image
  कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे पदवी प्रदान समारंभ संपन्न. उंडाळे -(प्रतिनिधी)      शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे व मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन, मलकापूर-कराड यांचा उंडाळे येथे दिनांक 5 मार्च 2020 रोजी पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती, कराड मा.श्री आबासाहेब पवार उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे मा. प्राध्यापक डॉ. एम.डी.गुजर उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्ष मा. ॲड.श्री आनंदराव पाटील माजी सदस्य जिल्हा परिषद, सातारा हे होते. तसेच कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.श्री जावेद शेख व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.श्री योगेश वाघमारे तसेच मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. राजश्री जोशी व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सौ.वनिता पाटील हे देखील उपस्थित होते.    या समारंभाची सुरुवात दिक्षांत मिरवणूकीने झाली दिक्षांत मिरवणूक सभास्था...
Image
"भीम आर्मी "संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्र दौऱ्यावर . " तरुणांचा संघटनेमध्ये वाढता सहभाग " "महाराष्ट्रात खंबीरपणे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणार "  कराड - (विनोद कांबळे)  भारताच्या संविधानानुसार भारतामध्ये लोकशाही  आहे असं असताना देखील अनुसूचित जाती, जमाती,व इतर मागास प्रवर्ग यांना आज देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व उपलब्ध नाही. संविधानात्मक हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळून देण्यासाठी ,अन्याय अत्याचारांच्या विरुद्ध संविधानात्मक मार्गाने लढण्यासाठी भीम आर्मी काम करते . आजही भारतीय संविधान पूर्णपणे कोणतीही राजकीय पक्ष लागू करत आलेला दिसत नाही. आजही एससी एसटी ओबीसी यांची परिस्थिती बिकटच आहे. फक्त मतदार म्हणून वापर करून घ्यायचा सत्ता स्थापन करायची आणि यांच्या विकासाकडे डोळे झाक करायची कशी पद्धत रूढ  आहे.   याच पद्धतीत बदल करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान कळाले पाहिजे आण...
Image
शहिद जवान कै. आनंदा शामराव कराळे अनंतात विलीन. विंग(वार्ताहर)-कुसूर  ता.कराड येथील सुपुत्र सुभेदार कै. आनंदा शामराव कराळे यांचे अपघाती निधन झाले. सविस्तर माहिती अशी, मंगळवार आज दिनांक ०३/०३/२०२० रोजी कुसुर ता.कराड गावचे सुपुत्र सुभेदार कै. आनंदा शामराव कराळे यांचा आज पहाटे ०३.०० वाजता पुणे हून कराड कडे येत असताना सातारा येथे मोटार सायकल अपघात झाला होता या  अपघातात त्यांचा मृत्यू झाला. कै. कराळे  सुभेदार हे रजेवर गावी आले होते.