उंडाळे परिसरात कडक संचारबंदी , उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई.
![]() |
| उंडाळे -रत्नागिरी मार्गावर बॅरिकेट्स लावुन वाहनाची तपासणी करताना उंडाळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी . |
‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक यांनी दिली.
‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानेआता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक यांनी दिली. त्याच अनुशंगाने उंडाळे -रत्नागिरी मार्गावर बॅरिकेट्स लावुन वाहनाची तपासनी केली जात असुन अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा वाहने वगळता कोणीही रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उंडाळे पोलीस दलाकडुन स्पष्ट केले आहे.
परिसरात कुठल्याही गावांमध्ये कोणी परदेशवारीवरून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन प्रशासनाकडुन केले आहे. संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता खपवून घेतले जाणार नाही. सर्व नाक्यांवर तैनात अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक वाहन तपासण्याचे आदेश दिले गेले असुन केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथिल केले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; मात्र अन्य कोणतेही वाहन रस्त्यावर आल्यास चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.

Comments
Post a Comment