कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे पदवी प्रदान समारंभ संपन्न.
![]() |
उंडाळे -(प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे व मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन, मलकापूर-कराड यांचा उंडाळे येथे दिनांक 5 मार्च 2020 रोजी पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती, कराड मा.श्री आबासाहेब पवार उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे मा. प्राध्यापक डॉ. एम.डी.गुजर उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्ष मा. ॲड.श्री आनंदराव पाटील माजी सदस्य जिल्हा परिषद, सातारा हे होते. तसेच कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.श्री जावेद शेख व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.श्री योगेश वाघमारे तसेच मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. राजश्री जोशी व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सौ.वनिता पाटील हे देखील उपस्थित होते.
या समारंभाची सुरुवात दिक्षांत मिरवणूकीने झाली दिक्षांत मिरवणूक सभास्थानी आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी संस्था गीत गाईले.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जावेद शेख यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. या समारंभाचे प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. राजश्री जोशी यांनी केली.
यानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री आबासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना पदवीचे महत्व सांगून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय प्रा. डॉ. एम.डी. गुजर यांनी स्नातकांना प्रेरणा देऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. समारंभाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मा.अॅड. श्री आनंदराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या कार्य वृत्तांताला उजाळा देऊन विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर यशस्वी विद्यार्थी स्नातकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य जे. एस. शेख यांनी आभार व्यक्त केले. या समारंभास संस्थेचे सचिव मा. श्री बी.आर. यादव संस्थेचे संचालक मा. श्री व्ही.के. शेवाळे मा. श्री शंकर पाटील तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. निलम कांबळे यांनी केले. समारंभाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Comments
Post a Comment