उंडाळे ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात केली औषध फवारणी.
" कोरोना या साथीच्या रोगाला प्रतिबंधक उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात केली औषध फवारणी ."
उंडाळे-प्रतिनिधी (प्रदीप पाटील)
उंडाळे ग्रामपंचायतीच्या वतीने "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू केल्या असून रविवारी उंडाळे गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रत्येक वॉर्ड , भाजी पाला कट्टा , मारुती मंदीरच्या परिसर मध्ये फवारणी करण्यात आली.
उंडाळे ता.कराड येथील नागरी वस्तीत फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांची होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होऊन विविध उपाययोजना करण्याचा दृष्टीने ग्रामपंचायतने पावले उचलली आहेत. शनिवार, रविवारी सकाळी ,संध्याकाळ ग्रामपंचायत कर्मचा-यामार्फत फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच दादासो पाटील, ग्रा.पं.सदस्य बापुराव पाटील उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते भवानी मंदीर परिसरापर्यंत फवारणीचे काम सुरू करण्यात आले त्यानंतर दिवसभरात सर्व नागरी वस्तीमध्ये फवारणीची अबंलबजावणी करण्यात आली .


Comments
Post a Comment