विराज थोरात याचे N.M.M.S. परीक्षेत यश.
स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळेचा विद्यार्थी.
उंडाळे-( प्रतिनिधी )
केंद्र सरकार सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वा. दादासाहेब उंडाळकर उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळेचा आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी विराज जयवंत थोरात याने यश संपादन केले.
डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . परीक्षा केंद्र शासनातर्फे राज्याच्या शैक्षणिक विभागांकडून आयोजित केली जाते. प्रत्येक प्रवर्गनिहाय या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो . त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये जिल्ह्यातील परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त ४५ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले . यामध्ये विराजला १८ वा गुणानुक्रम प्राप्त झालेला आहे.
त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरामधून त्याचे कौतुक होत आहे. या त्याच्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले .


Comments
Post a Comment