"भीम आर्मी "संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्र दौऱ्यावर .

" तरुणांचा संघटनेमध्ये वाढता सहभाग "

"महाराष्ट्रात खंबीरपणे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणार "





 कराड - (विनोद कांबळे)

 भारताच्या संविधानानुसार भारतामध्ये लोकशाही  आहे असं असताना देखील अनुसूचित जाती, जमाती,व इतर मागास प्रवर्ग यांना आज देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व उपलब्ध नाही. संविधानात्मक हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळून देण्यासाठी ,अन्याय अत्याचारांच्या विरुद्ध संविधानात्मक मार्गाने लढण्यासाठी भीम आर्मी काम करते .
आजही भारतीय संविधान पूर्णपणे कोणतीही राजकीय पक्ष लागू करत आलेला दिसत नाही. आजही एससी एसटी ओबीसी यांची परिस्थिती बिकटच आहे. फक्त मतदार म्हणून वापर करून घ्यायचा सत्ता स्थापन करायची आणि यांच्या विकासाकडे डोळे झाक करायची कशी पद्धत रूढ  आहे.   याच पद्धतीत बदल करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान कळाले पाहिजे आणि तो आपल्या हक्कानी अधिकारांसाठी प्रशासनाबरोबर संविधानात्मक मार्गाने लढला पाहिजे. यासाठी घराघरात  संविधान या उद्देशाने भीम आर्मी  संबंध भारतात काम करत आहे .
महाराष्ट्रातही भीम आर्मी मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे विशेषता  बहुजन समाजातील तरुणांच्या भीम आर्मीची क्रेझ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसून येते .





                      

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .