उंडाळे विभागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी.

" संचारबंदी मोडणारावर केली कारवाई." 


  उंडाळे - प्रतिनीधी  (प्रदीप पाटील )
राज्यात सर्वत्र संचारबंदी दरम्यान पोलिसांनी नागरिकांवर  कायद्याचा बडगा  चालवलाय. संचारबंदीतही अतिशाहण्या लोकांना पोलिस  चांगलीच समज देताना दिसतायेत. भुरभुशी ता.कराड येथे परिसरातील अतिशाहण्या युवकांना  पोलिसांनी आपला हिसका दाखवलाय. 

कोरोना पासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागु केली असुन उंडाळे परिसरात पोलीस प्रशासनाकडुन विशेष प्रयत्न केले जात आहेत मात्र संचारबंदीला झुगारून काही नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मंगळवारी उंडाळे परिसरात   गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्या निदर्शनास भुरभुशी ता.कराड येथील रस्त्यावर काही तरूण संचारबंदीचे उल्लघंन करताना आढळुन आले असता तत्काळ त्यांनी या रस्यावर फिरणार्‍या रस्त्यातच उठा बसा काढायला लावल्या आणि पोलीसी खाक्या दाखवला तेंव्हा कुठे या परिसरातील बहुतांशी युवकांनी तेथून पळ काढला.
पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा  शिकवल्याने  अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव मिळेल यांची  भिती निर्माण झाली.  याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, उंडाळे व परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली असुन अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त वैयक्तिक घराबाहेर पडणाऱ्यांना निश्र्चितच पोलीसाच्यांदांडुक्याची भिती निर्माण झाली आहे.
 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .