Posts

Showing posts from April, 2022

वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव येथे  राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.  यावेळी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या चे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या हातात बँनर, डिजिटल बोर्ड देऊन घोषणा देत रँली काढण्यात आली. जंतनाशक गोळीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. सर्वांनी जंतनाशक गोळीचे सेवन केले.    यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. डी.बी.निर्मळे यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्य सहाय्यिका सुनिता शिंदे, किरण शीद, आरोग्य सहाय्यक शंकर पाटील, आरोग्य सेवक बबन जाधव,अविनाश फातले,आशा सेविका जयश्री पाटील, मीना चांदणे, रूपाली रसाळ, सविता पोतदार,  मदतनीस सुरेखा भूतकर, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. मुख्याध्यापक सदावर्ते सर,अरूण पाटील सर ,आरोग्य सेवक बबन जाधव यांनी संयोजन केले.

माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन.

Image
  माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन. येवती - प्रतिनिधी. माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव शेवाळे यांचे निधन. येवती ता कराड येथील माजी पंचायत समिती सदस्य राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व सदाशिव कोंडीबा शेवाळे यांचे बुधवार दि २७ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सदाशिव शेवाळे सदाभाऊ या नावाने ओळखले जात होते त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे  .गावातील सरपंच  ते पंचायत समिती सदस्य अशी अनेक पदे  त्यांनी भूषविली .त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने येवती गावावर शोककळा पसरली आहे रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २९रोजी ९वाजता येवती येथे होणार आहे.

सौ. वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.

Image
 सौ. वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान. उंडाळे -  प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म ) घोगाव. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ वैशाली अमर पाटील यांनी पॅसिफीक युनव्हसिटी उदयपूर, राजस्थान या विद्यापीठातून फायटोकेमिकल  अँड फार्माकोलॉजीकल इव्हॅल्यूएशन ऑफ सिसबँनिया  ग्रॅन्डीफ्लोरा फॉर काॅगनिशन एनहान्सींग ॲक्टीव्हीटी या’’  विषयातून त्यांनी नुकतीच पी. एच. डी. पदवी प्राप्त केली.  त्यांना हि पदवी प्राप्त करण्यासाठी डॉ. किरण वाडकर, डॉ. अमितकुमार रावळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा  माननीय डॉक्टर उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

डॉ.सुंदर शेवाळे हिमॅटोलॉजी अँड ट्रान्सप्लांट सुपरस्पेश्यालिटी परीक्षेत देशात तेरावा.

Image
   डॉ.सुंदर शेवाळे हिमॅटोलॉजी अँड ट्रान्सप्लांट सुपरस्पेश्यालिटी परीक्षेत  देशात  तेरावा. उंडाळे - प्रतिनिधी.             येणपे-शेवाळेवाडी ता कराड येथील डॉ सुंदर शेवाळे यांनी रक्ताचे विकार ,ल्युकेमिया, लिम्फोमा,थॅलसेमिया ,सिकल सेल अँनिमिया थ्रोम्बोसिस आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयावर काम केले.यावर्षी नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेमध्ये  भारतात तेरावा  रॅक आला.त्याच्या या यशाबद्दल मान्यवरांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.   डॉ शेवाळे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शेवाळेवाडी आणि  माध्यमिक शिक्षण नेताजी सुभाष चंद्र कॉलेज ऑफ सायन्स येळगाव यानंतर उच्च शिक्षण एमबीबीएस ग्रँट मेडिकल कॉलेज अँड जे.जे हॉस्पिटल मुंबई तेथे झाले. एम.डी गव्हर्मेंट कॉलेज नांदेड येथे काम करत असताना सिकल सेल अँनिमिया आणि थॅलसेमिया  विकार यामध्ये विशेष गोडी निर्माण झाली.पुढे पाच वर्ष हिमॅटोलॉजी ( रक्तविकार ) या क्षेत्रात लीलावती हॉस्पिटल, टाटा मेडिकल सेंटर कोलकत्ता आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई सारख्या इंटरनॅशनल दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये...

जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला.

Image
  जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला. शिराळा - प्रतिनिधी. जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. असे प्रतिपादन कार्यक्रमावेळी   सुनिल घोलप अध्यक्ष व्यवस्थापन जि प  शाळा समिती चिंचोली यांनी केले.   कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पै. संपतराव जाधव, दादा उपमहाराष्ट्र केसरी हे  होते. प्रमुख अतिथी उपसरपंच राहुल जाधव, उपाध्यक्ष कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र राज्य  माजी उपसरपंच सुरेश जाधव, नाना  रूपाली जाधव, उपअध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होते. चिंचोली गावचे नुतन सरपंच श्री संपतराव जाधव दादा व उपसरपंच श्री राहुल जाधव यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  प्राथमिक शिक्षण घेऊन अनेक अधिकारी झाले. मुलांची शारीरिक क्षमता व शिक्षकांनी दिलेला अभ्यास पालकांनी करून घ्यावा. विषेश करून मुलांना मोबाइल पासून दुर ठेवा अन्यथा भविष्यात तरूण पिढी बरबाद ...

जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘वित्तपेटा’ची स्थापना.

Image
  जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘वित्तपेटा’ची स्थापना. डॉ. सुरेश भोसले : कराडमध्ये वित्तपेटा निधी संस्थेचे उद्घाटन. कराड, ता. ७ : कृष्णाकाठच्या आर्थिक समृद्धी आणि संपन्नतेसाठी कृष्णा आर्थिक परिवार सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. या आर्थिक परिवारात ‘वित्तपेटा’ या नव्या निधी संस्थेची भर पडली असून, या संस्थेच्या कराड येथील दत्त चौक परिसरातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेक वर्षांपासून बँकिंगची संकल्पना अस्तित्वात आहे. बँकिंगच्या माध्यमातून सर्वच भागातील लोकांची व उद्योग - व्यवसायांची मोठी आर्थिक प्रगती झाली आहे. वित्तपेटा निधी संस्थेच्या स्थापनेमुळे कृष्णाकाठच्या लोकांच्या आर्थिक प्रगतीत भर पडण्यास निश्चितच मदत होणार आहे.  डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, ग्रामीण भागासह शहरातील उद्योजकांना सुलभपणे कर्जपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसा...

डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘स्मृतिगंध’ पुस्तकाचे प्रकाशन.

Image
  डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘स्मृतिगंध’ पुस्तकाचे प्रकाशन. तळमावले/वार्ताहर अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांच्या सोबतच्या डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 6 एप्रिल 2022 रोजी खाडीलकर यांच्या जयंतीदिनी येथे झाले. डाॅ.डाकवे यांचे हे चौथे फोटो बुक आहे. ‘स्मृतिगंध’ ही स्पंदन प्रकाशनाची आठवी निर्मिती आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्रा.पी.आर.सावंत, देवबा वायचळ, महाव्यवस्थापक हेमंत तुपे, लेखक डाॅ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध, भेटींचे, प्रकाशनाचे, उपक्रमांचे फोटो यात आहेत. यापूर्वी नीलकंठ खाडीलकर यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 83 विविध भावमुद्रा डाॅ.डाकवे यांनी रेखाटल्या होत्या. त्या भावमुद्रांचे प्रदर्शन भरवून त्याच्या फोटोची फ्रेम नीलकंठ खाडीलकर यांना देण्यात आली होती. या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. तसेच खाडीलकर यांनी लिहलेल्या 6 पुस्तकांची मुखपृष्ठे डाॅ.संदीप डाक...

कृष्णा कृषी परिषदेची स्थापना.

Image
  कृष्णा कृषी परिषदेची स्थापना. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीसाठी होणार मदत  : डॉ सुरेश भोसले. अशोकराव थोरात यांची अध्यक्षपदी निवड. कराड - प्रतिनिधी. भारत हा कृषिप्रधान देश असून बदलत्या काळानुसार शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज असून त्यासाठी कृष्णा साखर कारखाना सलग्न कृष्णा कृषि परिषदेची स्थापना करण्यात आली आहे याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे अशी माहिती कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व अतुल भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. दरम्यान कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या परिषदेच्या अध्यक्षपदी शेती मित्र अशोकराव थोरात यांची निवड करण्यात आली.      अल्प भू धारक शेतकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी व उत्पादन वाढीसाठी या कृषी परिषदेचा फायदा होणार आहे.       तसेच परिषदेच्या माध्यमातून २२ डिसेंबरला सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार असून याची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ.अतुल भोसले यांनी दिली.   ...

तुळसण येथे सेवानिवृत्त जवानाचा सत्कार; वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत.

Image
तुळसण येथे सेवानिवृत्त जवानाचा सत्कार; वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत. उंडाळे : प्रतिनिधी.  भारतीय लष्करात 22 वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झालेले तुळसन (ता.कराड) येथील जवान  सचिन माने यांचे ग्रामस्थांच्या वतीने व मित्र परिवार यांच्या वतीने  जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा देऊन  जंगी मिरवणूक काढण्यात आली.देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या जवानास तुळसन  ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने अनोखा सॅल्यूट ठोकला आहे. 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते आपल्या तुळसन गावी परतले आहेत. तुळसन गावातील ग्रामस्थांनी जात, पात, धर्म, पंथ गट-तट विसरून जल्लोषात मिरवणूक काढली. दारासमोर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळी, फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, हारतुरे, देशभक्तीपर  गीते  ठिकठीकाणी महिलांनी केलेले औक्षण यामुळे संपूर्ण वातावरणच देशभक्तीमय झाले होते.   तसेच  या जवानांचा गावात पारायण बसले असता. महाराजांच्या वतीने सपत्नी मानाचा नारळ  देऊन सन्मान करण्यात आला. सचिन माने यांची 1999 ला सातारा मध्ये  भरती झाले.त्यानंतर आसाम,मणिपूर,पंजाब क...

प्रशांत सुकरे यांनी उभारली कर्तव्याची गुढी.

Image
  प्रशांत सुकरे यांनी उभारली कर्तव्याची गुढी. ' नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भरले ग्रामपंचायत कर.' कराड - प्रतिनिधी.          घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर हे प्रत्येक ग्रामपंचायतीचे एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे हे कर वेळेत भरणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नांदगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिल 22 रोजी)आपले स्वतः चे नावावरील तसेच वडिल व बंधूंचे नावावरील सर्व कर ग्रामपंचायतीमध्ये भरून एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.              गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला  ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आंबेकर यांच्याकडे या रकमेचा धनादेश प्रशांत सुकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी प्रणित कुचेकर, रोहित मुळीक,पोपट आवळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खरंतर कर वसुली हा विषय ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसतो. अनेकदा या वसुलीसाठी प्रशासनाला कटु कारवाई करावी लागते. अशा वेळी प्रबोधन ही गोष्ट महत्वाची बनते.  प्रशांत सुकरे यांचे ग्राम...