डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘स्मृतिगंध’ पुस्तकाचे प्रकाशन.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘स्मृतिगंध’ पुस्तकाचे प्रकाशन.
तळमावले/वार्ताहर
अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांच्या सोबतच्या डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 6 एप्रिल 2022 रोजी खाडीलकर यांच्या जयंतीदिनी येथे झाले. डाॅ.डाकवे यांचे हे चौथे फोटो बुक आहे.
‘स्मृतिगंध’ ही स्पंदन प्रकाशनाची आठवी निर्मिती आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्रा.पी.आर.सावंत, देवबा वायचळ, महाव्यवस्थापक हेमंत तुपे, लेखक डाॅ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध, भेटींचे, प्रकाशनाचे, उपक्रमांचे फोटो यात आहेत.
यापूर्वी नीलकंठ खाडीलकर यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 83 विविध भावमुद्रा डाॅ.डाकवे यांनी रेखाटल्या होत्या. त्या भावमुद्रांचे प्रदर्शन भरवून त्याच्या फोटोची फ्रेम नीलकंठ खाडीलकर यांना देण्यात आली होती. या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. तसेच खाडीलकर यांनी लिहलेल्या 6 पुस्तकांची मुखपृष्ठे डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केली आहेत.
प्रकाशनानंतर उपस्थितांनी या पुस्तकाची बारकाईने पाहणी केली. त्यांनी डाॅ.डाकवे यांच्या फोटो संग्रहाचे व फोटोबद्दलच्या अचूक माहितीचे, कलात्मक वृत्तीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
डाॅ.संदीप डाकवे यांची मुक्काम पोस्ट डाकेवाडी, सेलिब्रिटी कट्टा, ग्रेट स्केच भेट, ऋणानुबंध, अक्षर शुभेच्छा ही आगामी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

Comments
Post a Comment