सौ. वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.
सौ. वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म ) घोगाव. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ वैशाली अमर पाटील यांनी पॅसिफीक युनव्हसिटी उदयपूर, राजस्थान या विद्यापीठातून फायटोकेमिकल अँड फार्माकोलॉजीकल इव्हॅल्यूएशन ऑफ सिसबँनिया ग्रॅन्डीफ्लोरा फॉर काॅगनिशन एनहान्सींग ॲक्टीव्हीटी या’’ विषयातून त्यांनी नुकतीच पी. एच. डी. पदवी प्राप्त केली.
त्यांना हि पदवी प्राप्त करण्यासाठी डॉ. किरण वाडकर, डॉ. अमितकुमार रावळ यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment