डॉ.सुंदर शेवाळे हिमॅटोलॉजी अँड ट्रान्सप्लांट सुपरस्पेश्यालिटी परीक्षेत देशात तेरावा.
डॉ.सुंदर शेवाळे हिमॅटोलॉजी अँड ट्रान्सप्लांट सुपरस्पेश्यालिटी परीक्षेत देशात तेरावा.
उंडाळे - प्रतिनिधी.
येणपे-शेवाळेवाडी ता कराड येथील डॉ सुंदर शेवाळे यांनी रक्ताचे विकार ,ल्युकेमिया, लिम्फोमा,थॅलसेमिया ,सिकल सेल अँनिमिया थ्रोम्बोसिस आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयावर काम केले.यावर्षी नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेमध्ये भारतात तेरावा रॅक आला.त्याच्या या यशाबद्दल मान्यवरांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
डॉ शेवाळे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शेवाळेवाडी आणि माध्यमिक शिक्षण नेताजी सुभाष चंद्र कॉलेज ऑफ सायन्स येळगाव यानंतर उच्च शिक्षण एमबीबीएस ग्रँट मेडिकल कॉलेज अँड जे.जे हॉस्पिटल मुंबई तेथे झाले.
एम.डी गव्हर्मेंट कॉलेज नांदेड येथे काम करत असताना सिकल सेल अँनिमिया आणि थॅलसेमिया विकार यामध्ये विशेष गोडी निर्माण झाली.पुढे पाच वर्ष हिमॅटोलॉजी ( रक्तविकार ) या क्षेत्रात लीलावती हॉस्पिटल, टाटा मेडिकल सेंटर कोलकत्ता आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई सारख्या इंटरनॅशनल दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये काम केले. यादरम्यान रक्तविकार शास्त्रांमध्ये दोन विद्यापीठाचा फेलोशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.
रक्ताचे विकार , ल्युकेमिया, लिम्फोमा,थॅलसेमिया ,सिकल सेल अँनिमिया थ्रोम्बोसिस आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयावर काम.यावर्षी नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेमध्ये भारतात तेरावा रॅक आला .वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश विकल्प होते. परंतु बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि सेल्युलर थेरपी मध्ये विशेष रस असल्याने टाटा मेडिकल सेंटर कोलकत्ता येथे डी. एन . बी. क्लीनिकल हिमॅटोलॉजी अँड ट्रान्सप्लांट सुपरस्पेश्यालिटी या कोर्स मध्ये ऍडमिशन घेतले.एकही सुट्टी न घेता कामातूनच अभ्यास .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या वर विश्वास ठेवत आपले ध्येय गाठण्यात त्याला यश आले.डॉ मामन चांडी, डॉ देवी शेट्टी आणि डॉ तात्याराव लहाने यांना प्रेरणास्त्रोत मानतो .डॉ सुंदर शेवाळे हा कै.स्वा.शामराव पाटील नागरी सह. पतसंस्था मर्या. उंडाळेचे संचालक पोपट शेवाळे यांचा मुलगा असून वैद्यकीय क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment