जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला.

  जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला.






शिराळा - प्रतिनिधी.

जि.प. शाळा चिंचोली येथे शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला.

महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. असे प्रतिपादन कार्यक्रमावेळी  सुनिल घोलप अध्यक्ष व्यवस्थापन जि प  शाळा समिती चिंचोली यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पै. संपतराव जाधव, दादा उपमहाराष्ट्र केसरी हे  होते.

प्रमुख अतिथी उपसरपंच राहुल जाधव, उपाध्यक्ष कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र राज्य माजी उपसरपंच सुरेश जाधव, नाना रूपाली जाधव, उपअध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होते.चिंचोली गावचे नुतन सरपंच श्री संपतराव जाधव दादा व उपसरपंच श्री राहुल जाधव यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण घेऊन अनेक अधिकारी झाले. मुलांची शारीरिक क्षमता व शिक्षकांनी दिलेला अभ्यास पालकांनी करून घ्यावा. विषेश करून मुलांना मोबाइल पासून दुर ठेवा अन्यथा भविष्यात तरूण पिढी बरबाद होईल. चिंचोली जि प शाळा मॉडेल स्कूल मध्ये असल्याने खोल्यांचे व ग्राउंड चे काम सुरू आहे. थोड्याच दिवसात ते पुर्ण करु. शाळेत मध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मा.डी.आर.जाधव, सहा. पोलिस निरीक्षक मा.डॉ. नंदकुमार पाटीलसो,मा. सरपंच अमर जाधव ,मा. सरपंच फत्तेसिंग जाधव,मा. उप सरपंच सुरेश जाधव नाना,यांच्या सहकार्याने अनेक शालेय साहित्य उपलब्ध करून घेतले आहे. 

 वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळतील त्यांच्यात प्रोत्साहन  निर्माण व्हावे यासाठी जेष्ठ समाजसेवक बौद्ध धम्म अभ्यासक फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी डॉ. बबन घोलप दादा यांनी रोख रक्कम व पारितोषिक जाहीर केले आहे व ते 1 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे विद्यार्थ्यांना  वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मुलाणी सर यांनी केले, आभार सावंत सर यांनी मानले. मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शिक्षक स्टाफ व अंगणवाडी सेविका यांनी संयोजन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .