प्रशांत सुकरे यांनी उभारली कर्तव्याची गुढी.
प्रशांत सुकरे यांनी उभारली कर्तव्याची गुढी.
' नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भरले ग्रामपंचायत कर.'
कराड - प्रतिनिधी.
घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर हे प्रत्येक ग्रामपंचायतीचे एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे हे कर वेळेत भरणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नांदगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिल 22 रोजी)आपले स्वतः चे नावावरील तसेच वडिल व बंधूंचे नावावरील सर्व कर ग्रामपंचायतीमध्ये भरून एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आंबेकर यांच्याकडे या रकमेचा धनादेश प्रशांत सुकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी प्रणित कुचेकर, रोहित मुळीक,पोपट आवळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
खरंतर कर वसुली हा विषय ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसतो. अनेकदा या वसुलीसाठी प्रशासनाला कटु कारवाई करावी लागते. अशा वेळी प्रबोधन ही गोष्ट महत्वाची बनते. प्रशांत सुकरे यांचे ग्रामस्थांच्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
आधी केले नी मग सांगितले..
ग्रामस्थांनी कर वेळेत भरावेत असे नुसते आवाहन करुन उपयोग नाही. मात्र 'आधी केले नी मग सांगितले' ही उक्ती क्रतीत उतरवून प्रशांत सुकरे यांनी वेगळा संदेश दिला आहे.

Comments
Post a Comment