तुळसण येथे सेवानिवृत्त जवानाचा सत्कार; वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत.


तुळसण येथे सेवानिवृत्त जवानाचा सत्कार; वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत.

उंडाळे : प्रतिनिधी.

 भारतीय लष्करात 22 वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झालेले तुळसन (ता.कराड) येथील जवान  सचिन माने यांचे ग्रामस्थांच्या वतीने व मित्र परिवार यांच्या वतीने  जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा देऊन  जंगी मिरवणूक काढण्यात आली.देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या जवानास तुळसन  ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने अनोखा सॅल्यूट ठोकला आहे. 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते आपल्या तुळसन गावी परतले आहेत. तुळसन गावातील ग्रामस्थांनी जात, पात, धर्म, पंथ गट-तट विसरून जल्लोषात मिरवणूक काढली. दारासमोर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळी, फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, हारतुरे, देशभक्तीपर  गीते  ठिकठीकाणी महिलांनी केलेले औक्षण यामुळे संपूर्ण वातावरणच देशभक्तीमय झाले होते.


  तसेच  या जवानांचा गावात पारायण बसले असता. महाराजांच्या वतीने सपत्नी मानाचा नारळ  देऊन सन्मान करण्यात आला. सचिन माने यांची 1999 ला सातारा मध्ये  भरती झाले.त्यानंतर आसाम,मणिपूर,पंजाब काश्मीर,तसेच पाकिस्तान सीमेवर,मिजोरला बांगलादेश,ब्रम्हादेश आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. तसेच ट्रेनर म्हणून देखील काम पाहिले आहे.ते हवालदार पदावर 31 मार्च  2022ला ते बेंगलोर येथे सेवानिवृत्त झाले आहेत.  बोलताना म्हणाले, भारतमातेची सेवा करून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने  वाजत-गाजत केलेलं स्वागत अनोखे आहे. या स्वागताने मी भारावून गेलो आहे.


आई वडिलांचे आशीर्वाद ग्रामस्थांनी दिलेले प्रेम आशीर्वाद व केलेले स्वागत यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन. मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा व देशप्रेम अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच ठेवेल असे मत यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी भारत माता की जय, वंदे मातरमचा गजर करीत परिसर दणाणून सोडला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .