कृष्णा कृषी परिषदेची स्थापना.
कृष्णा कृषी परिषदेची स्थापना.
शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीसाठी होणार मदत : डॉ सुरेश भोसले.
अशोकराव थोरात यांची अध्यक्षपदी निवड.
कराड - प्रतिनिधी.
भारत हा कृषिप्रधान देश असून बदलत्या काळानुसार शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज असून त्यासाठी कृष्णा साखर कारखाना सलग्न कृष्णा कृषि परिषदेची स्थापना करण्यात आली आहे याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे अशी माहिती कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व अतुल भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. दरम्यान कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या परिषदेच्या अध्यक्षपदी शेती मित्र अशोकराव थोरात यांची निवड करण्यात आली.
अल्प भू धारक शेतकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी व उत्पादन वाढीसाठी या कृषी परिषदेचा फायदा होणार आहे.
तसेच परिषदेच्या माध्यमातून २२ डिसेंबरला सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार असून याची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ.अतुल भोसले यांनी दिली.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, संचालक जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, संजय पाटील, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, संभाजीराव पाटील, विलास भंडारे, सयाजी यादव, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले उपस्थित होते.

Comments
Post a Comment