वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा.


शिराळा - प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव येथे  राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.  यावेळी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या चे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या हातात बँनर, डिजिटल बोर्ड देऊन घोषणा देत रँली काढण्यात आली. जंतनाशक गोळीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. सर्वांनी जंतनाशक गोळीचे सेवन केले.

   यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. डी.बी.निर्मळे यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्य सहाय्यिका सुनिता शिंदे, किरण शीद, आरोग्य सहाय्यक शंकर पाटील, आरोग्य सेवक बबन जाधव,अविनाश फातले,आशा सेविका जयश्री पाटील, मीना चांदणे, रूपाली रसाळ, सविता पोतदार,  मदतनीस सुरेखा भूतकर, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

मुख्याध्यापक सदावर्ते सर,अरूण पाटील सर ,आरोग्य सेवक बबन जाधव यांनी संयोजन केले.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .