Posts

Showing posts from February, 2024

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे एन. एम. एम.एस. परीक्षे मध्ये उज्ज्वल यश.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे एन. एम. एम.एस. परीक्षे मध्ये उज्ज्वल यश.    शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे एन.एम.एम.एस. परीक्षे मध्ये उज्ज्वल यश संपादित केले सन 2023-2024 मध्ये विद्यालयातील पाच  विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे यात वैष्णवी शरद पवार, तनुजा अमृत देसाई, अमृता विलास यादव,स्नेहा सतिश साळुंखे, ऋषिकेश संतोष कारंडे आदिंचा समावेश आहे. तसेच या एन्एम्एम्एस् परीक्षेत एकूण 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत   उत्तीर्ण विद्यार्थी असे समीक्षा  रणजित कांबळे ,ईशा दादासो  कांबळे,संचिता भाऊसो जरग, स्वरदा अमित कांबळे.रवी  विनोद ठाकूर,श्रेयस सचिन कांबळे,विशाल सुरेश घोलप, ऋग्वेद राजू सातपुते,  इ. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय मुख्याध्यापक मा.श्री.अरविंद सदावर्ते सर यांनी प्रशस्तीपत्र,वही, पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे येथे संपन्न.

Image
  बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे येथे संपन्न. शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे) बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बौद्ध धम्म परिषद दीक्षाभूमी रिळे ता. शिराळा, जि. सांगली येथे संपन्न झाली.तथागत भगवान बुद्ध यांच्या संकल्पनेतील आचरणशील ,दुःख मुक्त समाज आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी दीक्षा भूमी रिळे ता. शिराळा, जि- सांगली या ठिकाणी तिसरी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमांमध्ये आदर्श धम्म प्रसारक यांचा सन्मान करण्यात आला या वेळी ज्ञानदेव कांबळे सोनवडे यांचा देखील आदर्श धम्म प्रसारक सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बोध महासभा हे उपस्थित होते.

पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी नियुक्ती .

Image
  पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या    महाराष्ट्र राज्याच्या  संघटक पदी नियुक्ती .  उंडाळे - प्रतिनिधी.   येवती  ता.कराड गावचे सुपुत्र दैनिक लोकमतचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे   यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमरावती येथे केंद्रीय कार्यकारिणीच्या  झालेल्या बैठकीमध्ये  केंद्रीय अध्यक्ष मनोहराव  सुने,केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान,केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे ,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे ,केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे  यांच्या उपस्थितीत  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार नियुक्ती  करण्यात आली. मागील  वर्षी  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा व चंद्रभागा रूरल  डेव्हलपर यांच्या संयुक्त विद्यमानाने  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये नामवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ,...

उद्या कासेगावात जंयत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार.

Image
  उद्या कासेगावात  जंयत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. कासेगाव - प्रतिनिधी.( उमेश कांबळे ) कासेगाव ता- वाळवा, जि- सांगली येथे आमदार श्री.जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी "जयंत केसरी बैलगाडी शर्यत" मा.अतुल लाहिगडे भाऊ यांनी आयोजित केली आहे. या शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे बैलगाडी विजेता  1 बी.एच.के बक्षीस अशी माहिती आयोजक अतुल भाऊ यांनी दिली. सदर शर्यत कासेगाव येथे आशीर्वाद हॉटेल पाठीमागे 80 एकर शेत जमिनीवर शर्यत संपन्न  होणार आहे.

यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर.

Image
  यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर. दि. 18 रोजी उंडाळे येथे स्वातंत्र्य सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण. उंडाळे : प्रतिनिधी. उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त 41 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिमस जळगाव चे अध्यक्ष अशोक  जैन यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्य यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह,  मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व  रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी प्रा....

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर.

Image
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर. वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे रस्त्याचे होणार चौपदरीकरण; फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही होणार निर्मिती. कराड शहराच्या प्रगतीला चालना देणाऱ्या प्रकल्पासाठी भाजपचे पाठबळ; शहराच्या वैभवात पडणार भर. कराड -प्रतिनिधी. कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या ५० कोटींच्या निधीतून कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही निर्मिती होणार असल्याने, या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.  भाजपा महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्यात रखडलेल्या विकासाला पुन्हा चालना देत, नवनव्या प्रकल्...

महिलांचा सहभाग हाच ग्रामविकासाचा पासवर्ड.

Image
  महिलांचा सहभाग हाच ग्रामविकासाचा पासवर्ड. कराड -प्रतिनिधी. "ग्रामपंचायतीत पाच वर्षांसाठी विश्वस्त म्हणून मिळालेल्या संधीतून सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिकार,कर्तव्य, जबाबदारी ओळखून कामे करा. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो, ती कामे यशस्वी होतात. क्रांतीज्योती प्रशिक्षणातून अधिक सक्षम होऊन ग्रामविकासचा पाया  म्हणजे महिलांचा सहभाग हाच पासवर्ड असल्याचे  सिध्द करू या,"असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सातारा जिल्हा परिषद,कराड पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे वर्ये-सातारा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सरपंच, सदस्यांचे क्रांतीज्योती प्रशिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज येथे आयोजित करण्यात आले आहे.दि.१३ ते १५ फेब्रुवारी कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून त्याचे उद् घाटन कराड पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी विजय विभूते, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे रजिस्टार डॉ.अरुण सकटे यांच्या हस्ते आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, प्रविण प्रश...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील सानिया चंद्रगडी व ऋतुजा मोहिते  या विद्यार्थिनींनी अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कार्डिओ टॉनिक्स ॲक्ट ऑन हार्टवरती त्यांनी मॉडेल बनवले होते. या विद्यार्थिनींना पारितोषिक व सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. सोनल सातपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.

Image
  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान संपन्न. सोलापूर - प्रतिनिधी.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना अधिविभाग यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024  चे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवार, प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा व कुलसचिव श्रीमती योगिनी घारे मॅडम व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ आर.जे. वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनायक धुळप यांनी "रस्ता सुरक्षा अभियान 2024" चे औचित्य साधून रस्ता सुरक्षा बद्दल जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारे 80 टक्के लोक हे साधारणपणे 18 ते 35 वयोगटातील असतात. तरुणांपर्यंत रस्ता सुरक्षा बाबतचे  नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी प्रमुख व्याख्याते श्री ...

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.

Image
  त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. भिम शक्ती तरुण मंडळ व भारतीय बौद्ध महासभा. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर साहेब शाखा चिंचोली, ता.शिराळा यांच्या वतीने  डॉ.बबन घोलप दादा यांच्या मार्गदर्शनाखाली  त्यागमुर्ती  माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी महामानवाच्या प्रतिमांचे  आणावरण संपन्न झाले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  मा. योगेश नाईक ग्रामविकास अधिकारी हे होते. प्रमुख वक्ते आयु. शंकर ढेकळे  हे होते. यावेळी  सरपंच सौ. कविता पाटील,  उपसरपंच, सौ. रूपाली जाधव, मा.दिनेश  जाधव ,मा.धनाजी जाधव, मा.आनंदा बाणकर, मा. शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर  भारतीय बौद्ध महासभेचे शिराळा तालुका संस्कार विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

सहज शिक्षा लर्निंग ॲप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : डॉ. अतुलबाबा भोसले.

Image
  सहज शिक्षा लर्निंग ॲप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : डॉ. अतुलबाबा भोसले. कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांना ॲपचे मोफत वितरण; पालक – शिक्षकांची मोठी उपस्थिती. कराड -प्रतिनिधी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, यासाठी सहज शिक्षा लर्निंग ॲप्लिकेशन बनविण्यात आले आहे. हे शैक्षणिक ॲप उपयुक्त असून, विद्यार्थी घडविणे हा एकमेव उद्देश ठेऊन कराड दक्षिणमधील हजारो विद्यार्थ्यांना या ॲपचे जास्तीत जास्त वितरण केले जाईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे आयोजित विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी भानुदास हुलवान होते. व्यासपीठावर कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा...

ऊस पाचट व्यवस्थापनामुळे कमी पाण्यात घेता येते अपेक्षित उत्पन्न .

Image
ऊस पाचट व्यवस्थापनामुळे कमी पाण्यात घेता येते अपेक्षित उत्पन्न .  उंडाळे -प्रतिनिधी.         शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील कृषीदुतांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत साळशिरंबे येथील शेतकऱ्यांना ऊस पाचट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक गावातील प्रगतशील शेतकरी श्री संजय बाळकृष्ण पाटील यांच्या शेत जमिनीवर करून दाखविले. ऊस पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी होणारे फायदे तसेच चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी व्यवस्थापन मध्ये पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व  व ऊस पाचट जाळल्यामुळे पर्यावरण आणि मातीवर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती सांगितली. ऊस पाचट व्यवस्थापन  हे ऊस शेतीत अत्यंत गरजेचा मुद्दा असून एकरी अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे यासाठी कृषिदूत सागर बंडगर, आदित्य बोरकर, प्रदीप ढेरे, दिग्विजय शिंदे, प्रथमेश जाधव, वैभव शेळके, वैभव शिंदे यांनी आवाहन केले.          या उपक्रमासाठी शासकीय कृषी महाविद्यालय , कराडचे सहयोगी ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्माकोविजिलन्स विषयावर व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्माकोविजिलन्स विषयावर व्याख्यान संपन्न. कराड -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी फार्माकोविजिलन्स या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.  फार्माकोविजिलन्स म्हणजे काय, त्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत, विविध फेजेस जसे की प्रिक्लीनिकल फेज 1, फेज 2, फेज 3, पोस्ट मार्केटिंग इत्यादी औषधांची गुणवत्ता, घातक परिणाम, रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतली जाणारी काळजी अशा विविध विषयक केल्या जाणाऱ्या तपासण्या, कारण कोणतेही नवीन औषध तयार केल्यानंतर त्याचे हानिकारक परिणाम दिसायला नकोत व कोणत्याही व्यक्तीला हाणी पोहचू नये याकरता फार्माकोविजिलन्स केले जाते. अशी माहिती डॉ. नेहा वाला यांनी दिली. डॉ. नेहा वाला या एमक्युअर फार्मास्युटकल येथे ग्लोबल हेल्थ फार्माकोविजिलन्स म्हणून कार्यरत आहेत. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले .

कराड दक्षिणमधील १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे होणार मोफत वितरण.

Image
  कराड दक्षिणमधील १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे होणार मोफत वितरण. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पुढाकार; सोमवारी विद्यार्थी-पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन . कराड -प्रतिनिधी. कराड दक्षिणमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ‘सहज शिक्षा लर्निंग’ या शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण केले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी याकामी पुढाकार घेतला असून, सोमवारी (ता. ५) सकाळी १० वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  शिक्षण हा सर्वांचा जिव्हाळ्याचा व अत्यंत आवश्यक घटक आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच डिजीटल साधनांचा वापर करुन शिक्षण मिळाले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, यासाठी ‘सहज शिक्षा लर्निंग’ ॲप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने मुलांना त्यांच्या सोयीच्या वेळ...