ऊस पाचट व्यवस्थापनामुळे कमी पाण्यात घेता येते अपेक्षित उत्पन्न .
ऊस पाचट व्यवस्थापनामुळे कमी पाण्यात घेता येते अपेक्षित उत्पन्न .
उंडाळे -प्रतिनिधी.
शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील कृषीदुतांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत साळशिरंबे येथील शेतकऱ्यांना ऊस पाचट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक गावातील प्रगतशील शेतकरी श्री संजय बाळकृष्ण पाटील यांच्या शेत जमिनीवर करून दाखविले. ऊस पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी होणारे फायदे तसेच चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी व्यवस्थापन मध्ये पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व व ऊस पाचट जाळल्यामुळे पर्यावरण आणि मातीवर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती सांगितली. ऊस पाचट व्यवस्थापन हे ऊस शेतीत अत्यंत गरजेचा मुद्दा असून एकरी अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे यासाठी कृषिदूत सागर बंडगर, आदित्य बोरकर, प्रदीप ढेरे, दिग्विजय शिंदे, प्रथमेश जाधव, वैभव शेळके, वैभव शिंदे यांनी आवाहन केले.
या उपक्रमासाठी शासकीय कृषी महाविद्यालय , कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. सतिश बुलबुले , कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे , केंद्र प्रमुख डॉ. राणी निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. रामभाऊ हंकारे आणि कृषि विस्तार विषयतज्ज्ञ डॉ. ज्योती वाळके यांनी मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment