पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी नियुक्ती .

 पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या    महाराष्ट्र राज्याच्या  संघटक पदी नियुक्ती . 

उंडाळे - प्रतिनिधी.

  येवती  ता.कराड गावचे सुपुत्र दैनिक लोकमतचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे   यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमरावती येथे केंद्रीय कार्यकारिणीच्या  झालेल्या बैठकीमध्ये  केंद्रीय अध्यक्ष मनोहराव  सुने,केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान,केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे ,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे ,केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे  यांच्या उपस्थितीत  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार नियुक्ती  करण्यात आली. मागील  वर्षी  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा व चंद्रभागा रूरल  डेव्हलपर यांच्या संयुक्त विद्यमानाने  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये नामवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले , पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम शेवाळे यांनी राबवले याचीच  दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा संघटक पदी फेर नियुक्ती करण्यात आली.  या नियुक्ती बद्दल माजी मुख्यमंत्री  आ.पृथ्वीराज चव्हाण बाबा ,माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवासजी  पाटील ,रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील  ,कराडचे  डीवायएसपी अमोल ठाकूर ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा  माजी पदाधिकारी  आदींनी अभिनंदन केले.शिवजयंतीच्या मुहूर्तावर  पत्रकार शेवाळे यांची निवड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .