कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्माकोविजिलन्स विषयावर व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्माकोविजिलन्स विषयावर व्याख्यान संपन्न.

कराड -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी फार्माकोविजिलन्स या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. 

फार्माकोविजिलन्स म्हणजे काय, त्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत, विविध फेजेस जसे की प्रिक्लीनिकल फेज 1, फेज 2, फेज 3, पोस्ट मार्केटिंग इत्यादी औषधांची गुणवत्ता, घातक परिणाम, रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतली जाणारी काळजी अशा विविध विषयक केल्या जाणाऱ्या तपासण्या, कारण कोणतेही नवीन औषध तयार केल्यानंतर त्याचे हानिकारक परिणाम दिसायला नकोत व कोणत्याही व्यक्तीला हाणी पोहचू नये याकरता फार्माकोविजिलन्स केले जाते. अशी माहिती डॉ. नेहा वाला यांनी दिली. डॉ. नेहा वाला या एमक्युअर फार्मास्युटकल येथे ग्लोबल हेल्थ फार्माकोविजिलन्स म्हणून कार्यरत आहेत.

यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .