कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील सानिया चंद्रगडी व ऋतुजा मोहिते या विद्यार्थिनींनी अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कार्डिओ टॉनिक्स ॲक्ट ऑन हार्टवरती त्यांनी मॉडेल बनवले होते.
या विद्यार्थिनींना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. सोनल सातपुते यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment