पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.

 पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.

सोलापूर - प्रतिनिधी.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना अधिविभाग यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024  चे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवार, प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा व कुलसचिव श्रीमती योगिनी घारे मॅडम व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ आर.जे. वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनायक धुळप यांनी "रस्ता सुरक्षा अभियान 2024" चे औचित्य साधून रस्ता सुरक्षा बद्दल जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारे 80 टक्के लोक हे साधारणपणे 18 ते 35 वयोगटातील असतात. तरुणांपर्यंत रस्ता सुरक्षा बाबतचे  नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी प्रमुख व्याख्याते श्री शिरीष तांदळे - मोटार वाहन निरीक्षक व त्यांच्या समवेत श्रीमती विद्यादेवी जाधव - सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, श्री अभिजीत वसागडे - सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व श्री चैतन्य गमे - सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. अपघात कमी करण्यासाठी शासनावर जबाबदारी न टाकता आपण वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करून जर वाहने चालवली तर अपघात अगदीच कमी होतील असे श्री शिरीष तांदळे यांनी सांगितले. अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची देशातील, महाराष्ट्रातील व सोलापुरातील आकडेवारी याबद्दल श्री अभिजीत वसागडे यांनी माहिती दिली. व श्रीमती विद्यादेवी जाधव यांनी रस्ता सुरक्षा नियमावली, वेगावरील नियंत्रण, रस्ता सुरक्षा बद्दल लहान मुलांच्या मनावर काही गोष्टी बिंबविला जाव्यात यासाठीच शिक्षण, सीट बेल्ट रोड साईन्स याबद्दलचे महत्त्व सांगितले. रस्ता सुरक्षेचे नियमांचे पालन करण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना डॉ. विनायक धुळप यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली व रस्ता सुरक्षा बद्दलच्या शंका व अडचणी याबद्दल आर.टी.ओ. अधिकाऱ्यांशी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून चर्चा केली. कार्यक्रमाप्रसंगी  प्रा. सुलभा बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना डॉ. विकास कडू यांनी आभार मानले.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .