विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे
विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे महिला महाविद्यालयात हिंदी सप्ताह संपन्न. कराड - प्रतिनिधी. दि. 14 सप्टेंबर, 1949 रोजी भारतीय संविधानामध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने हिंदी विभागाद्वारे हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये काव्यवाचन, वक्तृत्व, चित्रकला, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या समारंभासाठी स.गा.म.कॉलेजचे पूर्व हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. दिलिपकुमार कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले “देशाच्या विकासासाठी त्रिसूत्री भाषेचे पालन केले पाहिजे. हिंदी भाषा वैश्विक भाषा बनत आहे.” या समारंभाचे अध्यक्ष म्हणून महिला महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ सर उपस्थित होते. ते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले “हिंदी सर्वाधिक लोकांद्वारे बोलली जाणारी व समजली जाणारी मृदू भाषा आहे.या भाषेला सर्वांनी अंगीकृत केले तर साहित्य सृजनतेत भर पडेल”.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचा...