वाणिज्य व व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज

 वाणिज्य व व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज
__________ डॉ. ज्योती मोहोळकर.

 कराड - प्रतिनिधी

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापना मधील अलीकडील प्रवाह या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख व्याख्यात्या  डॉ.ज्योती मोहोळकर सहाय्यक प्राध्यापिका महिला महाविद्यालय कराड होत्या. त्या म्हणाल्या,वाणिज्य व्यवस्थापनातील सध्याचा कल पाहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणे काळाची गरज आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञान व डिजिटलायझेशनचे आहे. ए. आय. चा वापर वाढत आहे. सध्याच्या व्यापाराची बाजाराची बदलती परिस्थिती पाहता त्या समकक्ष अध्ययनाची अत्यंत आवश्यकता आहे. काळाबरोबर ज्ञानाच्या कक्षा उंचावलेल्या आहेत. वाणिज्य क्षेत्रात ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट, ग्रीन कॉमर्स, गिग इकॉनोमी, ब्लॉग चेन इत्यादींचा वापर होत आहे. या सर्वांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रामधील ई-गव्हर्नन्स व डिजिटल मॅनेजमेंट, हायब्रीड कल्चर,  मानवी संसाधनातील बदल, कार्पोरेट व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व शाश्वत व्यवस्थापन या बाबींच्या अभ्यासाची गरज आजच्या विद्यार्थ्यांना आहे. आज वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात सीए, अकाउंटंट, कंपनी सचिव, लेखापरीक्षक, अर्थशास्त्रज्ञ, कर सल्लागार, किंमत लेखापाल, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, वित्त नियंत्रक, लेखापरीक्षक, स्टॉक ब्रोकर इत्यादी अनेक क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.

             कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले आहेत. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलले पाहिजे. पूर्वीची वस्तू विमिनय पद्धत बंद होऊन सध्या डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात सक्षमपणे जगायचे असेल तर प्रत्येकाला हे ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रात झालेले बदल हे मानवानेच केलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात ही मानव अधिराज्य गाजवल्या वाचून राहणार नाही.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशा सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती धर्माधिकारी यांनी केला. आभार प्राध्यापक वैभव चव्हाण यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. काजल पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर विभागाच्या प्रा. मनाली रानडे व पर्यवेक्षक प्रा.सुरेश रजपूत उपस्थित होते. महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. सचिन बोलाईकर व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .