कलेच्या आस्वादाने चांगला माणूस घडतो
कलेच्या आस्वादाने चांगला माणूस घडतो
__प्रा. प्रदीप पाटील.
कराड : प्रतिनिधी.
येथील शिक्षण मंडळ, कराड आयोजित महिला महाविद्यालय ,कराड येथे पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन व ग्रंथ प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्रा. प्रदीप पाटील, इस्लामपूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. लोकमान्य टिळक व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील म्हणाले की,स्त्रियांनी शेतीचा शोध लावला व साहित्यनिर्मिती सुरुवातही स्त्रियांनी केली.जगातील अनेक शोधनिर्मितीत स्त्रियांचा सहभाग आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. साहित्याची निर्मिती ही भाषेतून होते. ती जगण्याशी निगडित असते. कला आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. जीवनातील स्वर व सूर यांचे वेगळेपण त्यांनी दाखवून दिले.चिमणी आणि कावळा यांच्या गोष्टींतून शेण व मेणाचा संबंध स्त्रियांच्या संवेदनशीलतेशी असल्याचे स्पष्ट केले.साहित्यातून माणसाच्या अंतरंगात डोकावता येते. लिहिण्यात, ऐकण्यात व जगण्यात नेमकेपणा येतो.
पहिल्या सत्रात विद्यार्थिनींनी विविध विषयांवर ललित साहित्याचे सादरीकरण केले. यामध्ये 'वाचनाने मला काय दिले?',मराठी, हिंदी, इंग्रजी कवितांचे सादरीकरण, कथाकथन, लघुनाटिका,पुस्तक परिचय, ललित लेख, अभंगवाणी निरूपण, प्रबोधनात्मक भाषण इ. विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. मृणाल सोनवणे या विद्यार्थिनींनी केले.प्रास्ताविकात तिने साहित्य संमेलनाचे महत्व,उद्दिष्ट व विद्यार्थिनींच्या सहभागाची गरज व्यक्त केली.पाहुण्यांची ओळख कु.आरती माने हिने केले तर सूत्रसंचालन कु. स्नेहा भरमगोंडा व कु. रिद्धी घोगरे यांनी केले तर आभार कु. कल्याणी पाटील हिने व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षण मंडळ, कराडच्या व्हा. चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सहसचिव श्री. राजेंद्र लाटकर,कौन्सिल सदस्या डॉ. मीना पेंढारकर, गुणवत्ता विकास समिती सदस्या श्रीमती वृषाली पाठक, श्रीमती सुवर्णा देशपांडे, श्री. जीवन थोरात, प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ, उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के, या संमेलनाचे समन्वयक श्री. विलास सुर्वे हे उपस्थित होते.

Comments
Post a Comment