विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे
विश्वस्तरावर हिंदी भाषेचा विकास : प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे
महिला महाविद्यालयात हिंदी सप्ताह संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
दि. 14 सप्टेंबर, 1949 रोजी भारतीय संविधानामध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने हिंदी विभागाद्वारे हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये काव्यवाचन, वक्तृत्व, चित्रकला, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या समारंभासाठी स.गा.म.कॉलेजचे पूर्व हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. दिलिपकुमार कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले “देशाच्या विकासासाठी त्रिसूत्री भाषेचे पालन केले पाहिजे. हिंदी भाषा वैश्विक भाषा बनत आहे.” या समारंभाचे अध्यक्ष म्हणून महिला महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ सर उपस्थित होते. ते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले “हिंदी सर्वाधिक लोकांद्वारे बोलली जाणारी व समजली जाणारी मृदू भाषा आहे.या भाषेला सर्वांनी अंगीकृत केले तर साहित्य सृजनतेत भर पडेल”.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये कु.सानिया मुल्ला, कु.धनश्री बामणे, कु.मेहेक सुतार, कु.सिफा मोमीन या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन गुणवत्ता हमी कक्ष व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भक्ती भालदारे, अतिथी परिचय प्रा.सचिन कर्चे, आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा.डॉ.रूपाली भोसले व सूत्रसंचालन प्रा.शितल खैरमोडे यांनी केले या समारोहात विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment