शिव केदार विद्यालात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न.
शिव केदार विद्यालात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
शिराळा - प्रतिनिधी.
शिव केदार विद्यालय,कांदे ,ता. शिराळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न झाली.अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 आणि राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा 2025- 26 या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. पोपटराव मलगुंडे साहेब गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिराळा यांचे शुभ हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. संजय पाटील सर मुख्याध्यापक अध्यक्ष, विज्ञान गणित अध्यापक मंडळ सांगली जिल्हा यांनी भूषविले. या कार्यक्रमास मा. निवासराव पाटील काका,संचालक वारणा विकास शिक्षण मंडळ कांदे उपस्थित होते.तसेच यावेळी मा. सौ. स्मिता पाटील मॅडम मा. सौ. सीतांजली जाधव मॅडम,मा. सौ. तेजश्री पाटील मॅडम,श्री. लहू कांबळे, श्री.आनंदा बंडगर, श्री. अमोल सपाटे उपस्थित होते .कु. आदिती विलास भोईटे इ. दहावी या विद्यार्थिनींने "आधुनिक कॉन्टॅम युग" या विषयावर वैज्ञानिक माहिती अत्यंत विस्तृतपणे सादर केली.मा. मलगुंडे साहेबांचा सत्कार शाल, बुके ,श्रीफळ देऊन करण्यात आला.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹




Comments
Post a Comment