संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार.
संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार.
_____ॲड. एस. के. भंडारे
सांगली - प्रतिनिधी.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 ते 18नुसार , कायद्यापुढे सर्व समान समान , धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्म स्थान या वरून भेदभाव करण्यास मनाई व सार्वजनिक जागा वापरण्यास कोणतेही बंधन घालता येणार नाही, नोकरी साठी समान संधी देणे मात्र मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करता येते.अस्पृश्यता नष्ट केली असून कोणीही अस्पृश्यता लादणे किंवा बाळगली तर त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा होतो इत्यादी समानतेच्या तरतुदी केल्या आहेत.
अनुच्छेद 19ते 22 नुसार , भाषण व आपले मत लिखाणातून सुद्धा व्यक्त करणे, शांततेने व विना शस्त्र एकत्र येणे संस्था स्थापन करणे, देशात सर्वत्र संचार करणे, राहणे व स्थायिक होणे आणि कोठेही व्यवसाय, व्यापार, धंदा व नोकरी करणे तसेच स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही, एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्तवेळा शिक्षा दिली जाणार नाही, व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्यात सांगितलेल्या पद्धती शिवाय हिरावून घेता येणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीस अटक केल्यास अटकेचे कारण सांगणे व त्याला स्वतःच्या बचावासाठी वकिला मार्फत संरक्षण घेणे, पोलिस न्यायालयाच्या आदेशाशिवाय 24 तासापेक्षा जास्त काळ जेल मध्ये ठेऊ शकत नाही अश्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या तरतूदी केलेल्या आहेत.
अनुच्छेद 23 ते 24 नुसार , अनैतिक कार्यासाठी माणसांची खरेदी विक्री व बेकायदेशीर व्यापार आणि त्यांना मारहाण, मानसिक छळ करणे, नोकरकडून काम करून घेणे व पगार न देणे, बाल कामगार प्रथेस (14 वर्षाच्या आतील बालकास नोकरीस ठेवण्यास) बंदी घातलेली आहे इत्यादी तरतूदी केलेल्या आहेत. अनुच्छेद 25 ते 28 नुसार धार्मिक स्वातंत्र्य दिले असून सर्व व्यक्तीना कोणताही धर्म स्विकारण्याचा व आचरण करण्याचे, धार्मिक संस्था स्थापन करण्याचे, चालविण्याचे आणि धार्मिक सूचना पालन करणे आणि सरकारने विशिष्ठ धर्मासाठी कर लावला तर तो नाकारण्याचा अधिकार/स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे.
अल्पसंख्याकाची भाषा, लिपी आणि संस्कृती चा अधिकार असून सरकारने चालविलेल्या किंवा आर्थिक मदत केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, वंश, जात, भाषा च्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क दिलेला आहे. हे अनुच्छेद 14ते 30 नुसार दिलेले मूलभूत अधिकार/हक्क दिलेले आहेत त्याची पायमल्ली झाली किंवा त्याच्यावर अतिक्रमण झाले तर अनुच्छेद 32,226 नुसार अनुक्रमे सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) कोणताही नागरिक किंवा संस्था दाखल करू शकतात आणि अनुच्छेद 13 नुसार या मूलभूत अधिकार/ हक्कांच्या विरुद्ध केलेले कायदे शून्यवत (रद्द)केलेले आहेत. अशी माहिती समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी समता सैनिक दलाच्या पहिल्या समता फोर्स महिला युनिटचा कॅम्प दिनांक 1/9/2025 ते 7/9/2025 पर्यंत पलूस येथील आर्मी रिटायर्ड हिम्मतराव होवाळ यांच्या पंचशील करिअर एकदमी मध्ये उद्घाटन करून भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. अँड एस के भंडारे यांनी पुढे असे सांगितले की, अनुच्छेद 51क नुसार भारतीयांची मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत त्यात प्रामुख्याने राष्ट्र ध्वज, राष्ट्रगीताचा आदर देशाचे संरक्षण करणे, एकता व एकात्मता मध्ये वाढ करणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेत उणेपणा येणाऱ्या प्रथांचा त्याग करणे इत्यादी कर्तव्य म्हणून नागरिकांवर जबाबदारी दिलेली आहे. या उद्घाटन प्रसंगी पंचशील करिअर ॲकडमीचे हिम्मतराव ओहाळ व कल्पना ओहाळ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कॅम्प चे प्रशिक्षक समता सैनिक दलाचे असि.स्टाफ ऑफिसर अशोक कदम, दादासाहेब भोसले व डी एम आचार्य, लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले व उमेश बागुल, मेजर जनरल मोहन सावंत व ॲड वंदनाताई सावंत, मेजर रुपेश तांमगावकर (अध्यक्ष , सांगली पूर्व जिल्हा) आणि रविंद्र लोंढे (अध्यक्ष, सांगली पश्चिम जिल्हा) इत्यादी उपस्थित होते. या कॅम्प साठी विशेष चाचणी घेऊन निवड झालेल्या मुंबई, रत्नागिरी , सातारा , धाराशिव, जालना, यवतमाळ,बुलढाणा, वाशिम, अकोला , अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिला सैनिक सहभागी झाल्या आहेत. सांगली पश्चिम जिल्हा शाखेच्या वतीने कॅम्पच्या शिबिरार्थीना वह्या, पेन देण्यात आल्या व सांगली पूर्व जिल्हा शाखेच्यावतीने मान्यवरांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शाहूच्या आठवणी हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा शाखेतील महिलाअध्यक्ष कीर्ती काटरे , सरचिटणीस सुरेश कांबळे, कोषाध्यक्ष विशाल कांबळे, उपाध्यक्ष शैलेश दंडवते इत्यादी पदाधिकारी व महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमापूर्वी आष्टा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आणि तासगांव येथील कांबळे वाडीतील समाज मंदिर मध्ये ॲड एस के भंडारे यांची दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धांच्या मातृ संस्थेच्या ट्रस्टी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्हा पश्चिम शाखा अंतर्गत दिनांक 30/8/2025 रोजी ॲड एस के भंडारे यांच्या मातोश्री शिक्षिका सुधा कल्लापा भंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुधा फाऊंडेशन तर्फे शाळाक्रमांक 3 व 14 च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आणि भवनसाठी एक कपाट भेट देण्यात आले. बौद्ध समाज बांधवांनी भवन मध्ये खुर्च्या दान दिल्या त्यांचा ही सन्मान करण्यात आला व आष्टा शहर कार्यकारिणी निवडण्यात आली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य रतन हाबळे व सारंग वरने, महेंद्र विरभक्त इत्यादींनी परिश्रम घेतले.
ॲड एस के भंडारे यांनी तासगांव येथील दि. 31/8/2025 रोजीच्या बैठकीत डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहत असलेले सांगली जिल्हा महाविहार (विपश्यना केंद्र) बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व वर्षावास निमित्त दुःख मुक्तीचा मार्ग या विषयावर प्रबोधन केले.याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तासगांव तालुका शाखेचे अध्यक्ष विशाल चंदूरकर होते. या कार्यक्रमास तासगांव, मिरज, कडेगांव, वाळवा, विटा,कवठेमंकाळ इत्यादी तालुक्यातून कार्यकर्ते, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Comments
Post a Comment