हजेरी घोटाळा मास्तरला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.
हजेरी घोटाळा मास्तरला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.
वीस हजार रूपयांचा दंड.
शासनाची केली फसवणूक.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-
रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील शिक्षक रामचंद्र गवळी यांना हजेरी घोटाळा करणे महागात पडले. जव्हार येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माया मथुरे यांनी गवळी यांना चार वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे दांड्या मारल्या नंतरही मस्टर मध्ये झोल करणाऱ्या तसेच अन्य अस्तापनातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडीत सातारा महाविद्यालयातून गवळी यांची मोखाडा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बंदी झाली होती कार्यमुक्त आदेश मिळूनही मोखाडा महाविद्यालयात तब्बल तीन महिन्यानंतर रुजू झाले. असे असतानाही मागील 53 दिवसाच्या गैरहजर काळातील हजेरीपटावर बोगस सह्या करून पगार घेतल्याचा आरोप संस्थेने केला. ही बनावगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तात्कालीन प्राचार्य रमेश भोर यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.
महाविद्यालयाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून न घेता विभागीय चौकशी करण्याची सूचना केली त्यानंतर संस्थेने आरोपी विरुद्ध चौकशी समिती नेमली असता गवळी यांच्या विरोधातील आरोप खरे असल्याचे आढळून आले त्यामुळे महाविद्यालयाने जव्हार न्यायालयात गवळी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता सदर खटल्याचे कामकाज सुमारे 13 वर्षे चालले.
(SOURCE - SAMANA ऑनलाइन)

Comments
Post a Comment