शास्ञीनगर विभागाच्यावतीने आमदार अतुलबाबा भोसले यांचा जाहिर सत्कार.

 शास्ञीनगर विभागाच्यावतीने आमदार अतुलबाबा भोसले यांचा जाहिर सत्कार.

राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ वरिल शास्ञीनगर विभागाला उड्डानपूलाखालून क्राॅसिंगला मंजूरी.

तानाजी देशमुख यांच्या पाठपुराव्याला अतुलबाबांचे पाठबळ.
अंतर्गत रस्ता व गटरसाठी २५ लाख रु निधीची घोषणा.

कराड - प्रतिनिधी.

कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील शास्ञीनगर विभागातील महामार्गाच्या पूर्व व पस्चिम विभागासाठी पिलर क्र ७५ ते ७६ दरम्यान कायमस्वरुपी रस्ता क्राॅसिंग मंजूर झाल्याबध्दल आमदार अतुलबाबा भोसले यांचा शास्ञीनगर विभागाच्यावतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला याप्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्ये उपस्थित होते.

यावेळी मलकापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतरावजी जाधव, सुरज शेवाळे, विजय देशमुख,शकिल मोमीन,शंकर सोनवले, औदूंबर सुरवसे,तुकाराम मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले कि या विभागातील नागरिक, विद्यार्थी,व्यावसायिकांची   क्राॅसिंगच्या मागणीची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मला नागरिकांच्यावतीने  निवेदन देण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,रस्तेविकास महामंडळ यांच्याशी समन्वय साधून या विभागाच्या रास्त मागणीचा विचार करुन या ठिकाणी कायमस्वरुपी क्राॅसिंग सुविधा उपलब्ध करुन द्याव्या अशी मागणी करण्यात आली. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाने आमच्या मागणीचा विचार करुन उड्डानपूल पिलर क्र ७५ ते ७६ दरम्यान क्राॅसिंगला मंजूरी दिली असुन लवकरच येथून नागरीक, शाळकरी विद्यार्थी, व्यावसायीक येजा करु शकतील.

नागरिकांच्या योग्य मागणीचा विचार करुन समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटीबध्द आहे. या विभागाने मला भरभरुन प्रेम दिले आहे तानाजी देशमुख यांच्या समयसुचकतेमुळे या भागाला क्राॅसिंगची सुविधा उपलब्ध होत आहे देशमुख यांच्या सारख्या लढवय्या कार्यकर्त्याच्या पाठीशी या भागातील जनतेने उभे राहण्याची गरज आहे. या विभागामध्ये अधिकची विकासकामे तसेच पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे तसेच एकता मंडळ परिसरातील रस्ता व गटरसाठी २५ लक्ष निधी देत असल्याची घोषणा आमदार अतुलबाबा भोसले यांनी सत्कारप्रसंगी  केली.

याप्रसंगी  शकिल मोमीन,फारुख बागवान,शंकर सोनवले,नंदकुमार गायकवाड,राजेंद्र शिंगण, बबन वास्के,रामेश्वर महाराज,अण्णा डिसले,दस्तगीर काझी, रासिक मलबारी, बजीरंग गोडगे, किशोर नांगरे, विठ्ठल थोरात,असजद तिगडीकर, मल्लिकिर्जून करपे, यांच्यासह महिला भगीनी, नागरिक बहुसंख्येने  उपस्थित होते,


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .