इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या प्रेसिडेंट पदी छाया पवार व सेक्रेटरीपदी सुषमा तिवारी यांची निवड.
कराड - प्रतिनिधीइनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या सन 2020 - 21 साठी छाया पवार व सेक्रेटरी पदी सुषमा तिवारी यांची एकमताने निवड करण्यात आली. इनरव्हील क्लब हा महिलांचा सामाजिक कार्य करणारा आंतरराष्ट्रीय क्लब आहे. कराडमध्ये गेली सहा वर्ष इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या वर्षी चे बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढील प्रमाणे
व्हा.प्रेसिडेंट- विद्या पावसकर
जॉईंट सेक्रेटरी- तरुणा मोहिरे
ट्रेजरर - माहेश्वरी जाधव
आय एस ओ - श्रुती जोशी
सी सी. - अलका शिंदे
एडिटर -- भाग्यश्री पवार
सीसी एम एम -- चांदणी लदाणी
यांची निवड करण्यात आली.
येणाऱ्या वर्षांमध्ये कोरोना महामारी संकटापासून संरक्षण करण्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच हायजेनिक व ऑर्गानिक फुड च्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. दुर्गम भागातील महिलांसाठी आरोग्य शिबीर, कापडी पिशव्यांचे वाटप, महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन संपूर्ण वर्षभरामध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment